मुंबई इंडियन्सच्या अनुभवी संघासमोर IPL 2020 मध्ये अंतिम फेरीत दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. पण संपूर्ण स्पर्धेत युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने धडाकेबाज कामगिरी करून दाखवली. श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन अशा काही खेळाडूंनी आपल्या खेळीच्या जोरावर सामने जिंकवूनदेखील दिले. दिल्लीच्या संघात सुरूवातील स्थान न मिळालेल्या अजिंक्य रहाणेनेही नंतर आपली प्रतिभा दाखवून दिली. या साऱ्यांना IPL 2021साठी संघात कायम राखण्यात आलं आहे. पण काही खेळाडूंना मात्र IPL 2021 च्या लिलावाआधीच दिल्लीच्या संघाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

कायम राखलेले खेळाडू

शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, आवेश खान, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, ख्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स

करारमुक्त केलेले खेळाडू

मोहित शर्मा, तुषार देशपांडे, कीमो पॉल, संदीप लामिचने, अ‍ॅलेक्स कॅरी, जेसन रॉय