तिसऱ्या दिवसअखेर पाहुण्यांकडे तब्बल ४४८ धावांची आघाडी

वेस्ट इंडिज-इंग्लंड कसोटी मालिका

सेंट लुसिआ : विश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जो रूटने साकारलेल्या दमदार नाबाद शतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद ३५८ धावा अशा भक्कम धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडकडे दुसऱ्या डावात तब्बल ४४८ धावांची आघाडी जमा आहे.

रूट १११, तर बेन स्टोक्स २९ धावांवर खेळत आहेत. जो डेन्लेनेदेखील ६९ धावांचे योगदान दिले. त्यामुळे पहिल्या डावात १२३ धावांची आघाडी घेणाऱ्या इंग्लंडने वेस्ट इंडिजवर आता पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. मालिकेत वेस्ट इंडिजने २-० अशी आघाडी घेतली असून कर्णधार कालरेस ब्रॅथवेटला षटकांच्या संथ गतीबद्दल या सामन्यांतून वगळण्यात आले आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद २७७

वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्व बाद १५४

इंग्लंड (दुसरा डाव) : १०० षटकांत ४ बाद ३२५ (जो रूट खेळत आहे १११, जो डेन्ले ६९; किमो पॉल १/११).