वेस्ट इंडिजविरूद्धच्या अखेरच्या कसोटी इंग्लंडचा पहिला डाव ३६९ धावांवर संपला. त्यानंतर इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १९७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेरीस मोठी आघाडी मिळाली. पण फॉलोऑन न देता इंग्लंडने दुसऱ्या डावात फलंदाजी केली. सलामीवीर सिबली (५६) आणि बर्न्स (९०) यांनी दमदार अर्धशतक झळकावले. पण कर्णधार जो रूटचे अर्धशतक विशेष ठरले.

जो रूटने नाबाद ६८ धावा केल्या. त्याने अत्यंत जलदगतीने ५६ चेंडूने ८ चौकार आणि एका षटकारासह ही कामगिरी केली. जो रूटचे हे ६६वे कसोटी अर्धशतक ठरले. त्याने दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ (६५ कसोटी अर्धशतके) याला मागे टाकले. तर पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियाँदाद याच्याशी बरोबरी साधली. आता जो रूट सचिनच्या कसोटी अर्धशतकांपासून २० अर्धशतके दूर आहे.

दरम्यान, इंग्लंडचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपल्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे १९७ धावांवर संपुष्टात आला. त्यातच दुसऱ्या डावात इंग्लंडच्या सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली. त्यांनी शतकी भागीदारी केल्यानंतर सिबली (५६) बाद झाला. त्यानंतर कर्णधार जो रूटच्या साथीने बर्न्सने डाव पुढे नेला. शतकाच्या नजीक असताना बर्न्स ९० धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार रूटने (नाबाद ६८) डाव घोषित केला.