अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सेलिब्रिटींपासून ते क्रीडाविश्वातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. यात अनेक दिग्गजांचा समावेश असून WWE सुपरस्टार जॉन सीनानेही सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहिली आहे.

डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्रामवर सुशांत सिंह राजपूतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याने कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. मात्र तरी अनेकांचं लक्ष या पोस्टकडे वेधलं आहे. जॉन सीनाचं कोणत्याही भारतीय कलाकारांशी किंवा क्रीडाविश्वातील व्यक्तींशी फारशी ओळख नाही. मात्र तरीदेखील तो अनेक वेळा मनोरंजन विश्वासंदर्भात फोटो पोस्ट करताना दिसतो. यापूर्वी त्याने बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचाही फोटो पोस्ट करुन त्यांना आदरांजली वाहिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on

सुशांत सिंहचा फोटो पोस्ट करुन त्याला श्रद्धांजली वाहणाऱ्या जॉनने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सुशांतचा एक फोटो शेअर केला होता. जॉन अनेक वेळा भारतीय व्यक्तींचे फोटो शेअर करत असतो.

दरम्यान, कलाविश्वातील अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. यात प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, सारा अली खान, रणवीर सिंग,दीपिका पदुकोण, सलमान खान, शाहरुख खान, मीरा चोप्रा रविना टंडन, उर्वशी रौतेला, प्रविण तरडे, एकता कपूर अशा अनेकांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.