News Flash

‘‘राहुल…नाम तो सुना ही होगा’’

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राहुलकडून मोठा टप्पा सर

राहुल त्रिपाठी

आयपीएल 2021मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यात आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सामनाखेळला जात आहे. नाणेफेक गमावलेल्या केकेआरने प्रथम फलंदाजी करून हैदराबादसमोर विजयासाठी 188 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. केकेआरने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 187 धावा केल्या. नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांनी केकेआरकडून शानदार खेळी केल्या.

शुबमन गिल लवकर बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने संघासाठी योगदान दिले. त्याने 29 चेंडूत 5 चौकार आणि दोन षटकारांसह 53 धावांची खेळी केली. शिवाय, नितीश राणासोबत 93 धावांची भागीदारी रचली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धची ही खेळी राहुलसाठी अविस्मरणीय ठरली. 30 वर्षीय राहुलने आयपीएल कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले आणि आयपीएलमध्ये एक हजार धावांचा टप्पा पार केला.

 

केकेआर व्यतिरिक्त राहुलने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि राइझिंग पुणे सुपरजायंट्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्रिपाठीने आतापर्यंत आयपीएलमधील 46 सामन्यात 6 अर्धशतकांच्या मदतीने 1041धावा केल्या आहेत. 93 धावा ही राहुलची सर्वोत्तम खेळी आहे. 2017मध्ये पुण्याकड़ून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना राहुलने ही कामगिरी केली होती.

सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत आयपीएलचे एकदा विजेतेपद जिंकले आहे, तर केकेआरने दोन विजेतेपदे नावावर केली आहेत. गेल्या 5 वर्षांपासून हैदराबाद संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे, तर केकेआरचा संघ गेल्या मोसमात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 10:14 pm

Web Title: kkr batsman rahul tripathi completes 1000 ipl runs adn 96
Next Stories
1 करोनाला षटकार ठोकणाऱ्या नितीश राणाची आयपीएलमध्ये खास कामगिरी
2 SRH vs KKR : कोलकाताचा हैदराबादवर 10 धावांनी विजय
3 ‘‘ऋषभ पंत हा निर्भीड आणि शांत कर्णधार’’
Just Now!
X