करोनाच्या भीतीमुळे गेले तीन-चार महिने बंद असलेले क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ८ जुलैपासून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी क्रिकेटची सुरूवात होणार आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघदेखील रविवारी इंग्लंडला तीन सामन्यांच्या कसोटी आणि तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी रवाना झाला. पण भारतीय क्रिकेट संघाला आणि चाहत्यांना मात्र अजून वाट पाहावी लागणार आहे. कारण BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने टीम इंडियाचे प्रशिक्षण शिबीर ऑगस्ट महिन्याच्या आधी सुरू होणार नसल्याचे सांगितले. या वृत्तानंतर चाहतेही नाराज झाले. त्यामुळे खेळाडूंना आणखी काही दिवस घरात बसून राहावे लागणार आहे. त्यामुळे क्रिकेटपटू सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून आपला वेळ घालवत आहेत.
सलामीवीर लोकेश राहुलने नुकताच एक फोटो पोस्ट केला. लोकेश राहुलने घरात बसून कॉफी पितानाचा फोटो पोस्ट केला. या फोटोला त्याने केवळ कॉफी इतकेच कॅप्शन दिले. त्या फोटोवरून चाहत्यांनी त्याला त्याच्या आयुष्यातील कॉफी विथ करण शो बद्दलची आठवण करून दिली. त्या शो मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या हार्दिक पांड्यासोबत राहुलही असल्याने त्याला काही काळ क्रिकेटबंदीचा सामना करावा लागला होता. त्याचीच आठवण चाहत्यांना त्याला करून दिली आणि कॉफीपासून दूरच राहा, असा सल्ला दिला.
कर्णधार विराट कोहलीने या फोटोवरून राहुलला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याने फोटोतील कॉफीचा कप खराब असल्याचा रिप्लाय करत राहुलची टिंगल करण्याचा प्रयत्न केला. पण राहुलने त्यावर एकदम झकास उत्तर दिलं. कॉफीचा कप खराब असला, तरी माझं हृदय मात्र एकदम साफ आहे असा रिप्लाय देत राहुलने विराटला गप्प करून टाकलं
दरम्यान, राहुलच्या या पोस्टनंतर अनेक मीम्सदेखील व्हायरल झाली होती.