07 July 2020

News Flash

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा : बरोबरीची कोंडी फुटेना!

गेल्या चार डावांपेक्षा गुरुवारी रात्री अतिशय रंगतदार डावाची अनुभूती चाहत्यांना मिळाली.

कार्लसन-कारुआना यांच्यातील पाचवा डावही बरोबरीत

कार्लसन-कारुआना यांच्यातील पाचवा डावही बरोबरीत

लंडन : तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यात सुरू असलेल्या जागतिक अिजक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील पाचवा डावही बरोबरीत सुटला. गेल्या चार डावांपेक्षा गुरुवारी रात्री अतिशय रंगतदार डावाची अनुभूती चाहत्यांना मिळाली. पण जवळपास सव्वातीन तास रंगलेला हा डाव ३४ चालींनंतर बरोबरीत राहिला.

आता पाच फेऱ्यांनंतर दोघांचेही प्रत्येकी २.५ गुण झाले आहेत. नॉर्वेच्या कार्लसनला पुढील दोन डावांत पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याची संधी मिळणार असल्यामुळे याचा फायदा उठवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळण्याची संधी कारुआनाला मिळाली असली तरी या आठवडय़ात तिसऱ्यांदा सिसिलियन व्हेरिएशनने डावाला सुरुवात झाली. सुरुवातीला काहीसा चाचपडणाऱ्या कारुआनाने सहाव्या चालीनंतर आक्रमक पवित्रा अवलंबला. आपल्या प्याद्याचा बळी देत त्याने कार्लसनवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.

पटावर चांगली स्थिती निर्माण करणाऱ्या कारुआनाला १३व्या चालीपर्यंत मोहरे सरकवण्यास फक्त १३ सेकंदांचा अवधी लागत होता. पण १९व्या चालीनंतर त्याचा वेग मंदावला. कारुआनाच्या प्रत्येक चालीला उत्तर असल्याचे दाखवून देत कार्लसनने हा सामना बरोबरीत सोडवला. ‘‘पाचवा डाव खरोखरच रंगतदार होता. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना अशीच परिस्थिती राहिल्यास चांगले होईल. कार्लसनने चांगला अभ्यास केल्यामुळे त्याने या डावात चांगला खेळ केला,’’ असे कारुआनाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2018 12:01 am

Web Title: magnus carlsen thwarts game 5 ambush in draw with fabiano caruana
Next Stories
1 Hong Kong Open Badminton : समीर वर्मा स्पर्धेबाहेर, भारताचे आव्हान संपुष्टात
2 सेहवागने टीम इंडियाला दिला कानमंत्र, म्हणाला…
3 शिस्तभंग प्रकरणी जो रुटवर ICCकडून कारवाई
Just Now!
X