News Flash

महेश भूपतीवर पैसे बुडविल्याचे आरोप

भूपतीने २०१४ मध्ये आयपीटीएलची स्थापना केली.

स्टार खेळाडूंचा सहभाग असलेल्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगमध्ये (आयपीटीएल) सहभागी असलेल्या एका दूरचित्रवाणी कंपनीचे पैसे बुडविल्याचा आरोप भारताचा अव्वल टेनिसपटू महेश भूपती याच्यावर लावण्यात आला आहे. मात्र या परिस्थितीला आपण जबाबदार नसल्याचे सांगत भूपतीने या प्रकरणी आपले हात झटकले आहेत.

भूपतीने २०१४ मध्ये आयपीटीएलची स्थापना केली. या लीगमध्ये रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांच्यासारखे जगातील मातब्बर टेनिसपटू सहभागी झाले होते. पण आर्थिक चणचणीमुळे २०१६ मध्ये ही स्पर्धा बंद करण्यात आली. भूपतीने करारातील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ब्रॉडकास्ट स्पोर्ट्स न्यूज या दूरचित्रवाणी कंपनीने केला आहे.

पैसे मिळण्यास विलंब झाल्याचे भूपतीने मान्य केले असले तरी ही स्पर्धा माझ्यामुळे बंद पडली नाही. या लीगमधील एका संघाचे हक्क असलेल्या लिजेंडरी समूहाने दिलेल्या खोटय़ा आश्वासनांमुळे ही स्पर्धा बंद करावी लागली, अशी स्पष्टोक्ती भूपतीने दिली आहे.

ब्रॉडकास्ट स्पोर्ट्स न्यूजने एक पत्रक काढून भूपती आणि आयपीटीएलने आपल्यासह अनेक समभागधारकांचे पैसे थकविले, याबाबतचे आरोप केले आहेत. ‘‘संपूर्ण प्रोडक्शन विभाग, तंत्रज्ञान सेवा पुरविणारे, वितरक, पंच आणि टेनिसकोर्ट बनविणाऱ्यांना २२ महिन्यांनंतरही फी, व्हिसा खर्च, दैनंदिन भत्ता आणि प्रवासाचे मानधन मिळाले नाही,’’ असे या पत्रकात म्हटले आहे. खेळाडूंना पैसे देण्याची जबाबदारी लीगची होती तर प्रसारण कंपनी आणि अन्य जणांचे पैसे देण्याची जबाबदारी ही लिजेंडरी समूहाची होती.

‘‘खेळाडूंना जवळपास पाच दशलक्ष डॉलरचे देणे अद्याप बाकी आहे. यापैकी अनेक खेळाडू आणि कंपन्यांचे मालक हे माझे सहकारी आहेत. त्यामुळेच अधिक वेदना होत आहेत. आम्ही सर्वाचेच पैसे परत करणार आहोत. पण त्या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागणार आहे,’’ असेही भूपतीने सांगितले. याविषयी अनेक खेळाडूंनी अद्याप मौन बाळगले असले तरी यावर्षी क्रोएशियाचा आघाडीचा टेनिसपटू मारिन चिलीचने आवाज उठवल्यानंतर या प्रकरणाने जोर पकडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 2:04 am

Web Title: mahesh bhupathi accused of non payment
Next Stories
1 भारताच्या दिनेश सिंगला पहिले सुवर्ण; रवीकुमारला कांस्य
2 संघर्षपूर्ण सामन्यानंतर ओसाका उपांत्य फेरीत
3 भारतीय पुरुष संघ सहाव्या स्थानी
Just Now!
X