23 September 2020

News Flash

मरे, फेरर अंतिम फेरीत

अमेरिकन ओपन विजेता अँडी मरे व डेव्हिड फेरर यांनी सोनी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

| March 31, 2013 02:12 am

अमेरिकन ओपन विजेता अँडी मरे व डेव्हिड फेरर यांनी सोनी ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
मरे याने आठव्या मानांकित रिचर्ड गास्केट याचे आव्हान ६-७ (३-७), ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. तृतीय मानांकित खेळाडू फेरर याने पंधराव्या मानांकित टॉमी हास याची अनपेक्षित विजयाची मालिका ४-६, ६-२, ६-३ अशी खंडित केली. मरे व फेरर या दोन्ही खेळाडूंनी पहिला सेट गमावल्यानंतर सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण मिळवित विजयश्री खेचून आणली. मरे याने २००९ मध्ये येथे विजेतेपद मिळविले होते.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 2:12 am

Web Title: mare ferar in final round
टॅग Sports,Tennis
Next Stories
1 गंभीर तंदुरुस्त; रविवारी संघात दाखल होणार
2 संघटकांचीच अग्निपरीक्षा!
3 रायडरच्या प्रकृतीत सुधारणादोन हल्लेखोरांना अटक
Just Now!
X