इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरु होत आहेत. १९ सप्टेंबर म्हणजेच रविवारी ही स्पर्धा पाचवेळा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील तीनदा आयपीएल विजेता राहिलेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाशी सामना खेळणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा संघ मैदानात उतरणार असून हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा आणि मार्गदर्शक सचिन तेंडुलकर संघात सामील झाले आहेत. सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. मुंबई इंडियन्स संघाचे मार्गदर्शक सचिन तेंडुलकरला यूएईमध्ये क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. सचिन तेंडुलकरचा क्वारंटाईन कालावधी आज (शुक्रवार) संपला. तो त्याच्या टीममध्ये सामील झाला आहे. टीमसोबत बसमध्ये बसलेला आपला फोटो शेअर करताना सचिन तेंडुलकरने लिहिले, अबू धाबी येथे पलटन मुंबई इंडियन्स सोबत जोडल्याचा आनंद झाला. रविवारी होणाऱ्या सामन्यासाठी उत्सुक आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये जेतेपद पटकावले. मुंबईला जेतेपदाची हॅट्ट्रिक मारण्याची संधी असेल.

मुंबई इंडियन्स स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार), अॅडम मिलने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जेम्स नीशम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, किरन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जॉन्सन , मोहसीन खान, नॅथन कुल्टर-नाईल, पियुष चावला, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट आणि युधवीर सिंग.