16 December 2017

News Flash

माही तयार हो रहा है!

श्रीलंकेच्या दौऱ्याआधी धोनीचा बंगळुरुत सराव

लोकसत्ता टीम | Updated: August 11, 2017 7:14 PM

धोनीने आपल्या सहकाऱ्यांसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी श्रीलंकेविरुद्ध वन-डे आणि टी-२० सामन्यासाठी धोनीसध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. ट्रेनिंग सेशननंतर आपल्या सहकाऱ्यांसोबतचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोत धोनीसोबत सुरेश रैना आणि केदार जाधवही दिसत आहे.

NCA all test’s done.20 mtr in 2.91sec. Run a 3 done in 8.90sec.time for heavy lunch

A post shared by @mahi7781 on

ट्रेनिंग सेशनमध्ये धोनीने २० मी.ची शर्यत २.९१ सेकंदांमध्ये पूर्ण केली. यानंतर धोनी आणि त्याच्या साथीदारांनी जेवणावर ताव मारला.

याशिवाय युरोपमध्ये आपलं ट्रेनिंग पूर्ण करत सुरेश रैनाही बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. रैनाने जसप्रीत बुमराहसोबत आपला ट्रेनिंगदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रैनाही संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. २०१५ साली सुरेश रैना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला शेवटचा वन-डे सामना खेळला होता. त्यामुळे आगामी मालिकेत संघात कोणाला जागा मिळतेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – श्रीलंकेविरुद्ध वन-डे मालिकेत भारताच्या दिग्गजांना विश्रांती?

First Published on August 11, 2017 7:13 pm

Web Title: ms dhoni joins nca academy in bengaluru for upcoming sri lanka odi series takes part in tanning session