न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघ मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार रोहित शर्माच्या काहीसा अंगलट आला, कारण न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी केली. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर सिफर्टला यष्टीचीत करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. मात्र यष्टीरक्षक या नात्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम करण्यापासून धोनी अजुनही दोन पावलं दूर आहे.

धोनीने आतापर्यंत 594 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पडली आहे आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टीरक्षक मार्क बाऊचर या यादीत धोनीच्या पुढे असून त्याने 596 सामन्यांमध्ये यष्टीरक्षण केलं आहे. त्यामुळे हा विक्रम आपल्या नावे करण्यासाठी धोनीला आणखी काही काळासाठी वाट पहावी लागणार आहे.