रविवारी दोन्ही फेरींत विजय ; सर्वोत्तम शर्यतपटूच्या यादीत अव्वल

मुंबईकर नयन चटर्जीने जेके टायर राष्ट्रीय अजिंक्यपद शर्यतीच्या दुसऱ्या व अखेरच्या दिवशी ‘युरो जेके-१६’ प्रकारात दमदार पुनरागमन केले. नयनने तिसऱ्या व चौथ्या फेरीत एकहाती वर्चस्व गाजवत सर्वोत्तम शर्यतपटूसाठीची दावेदारी अधिक भक्कम केली. येथील करी मोटर स्पीडवे ट्रॅकवर रविवारी पार पडलेल्या शर्यतीत त्याने बाजी मारत ५८ गुणांसह अव्वल स्थान पटकावले, तर ४८ गुणांसह अनंत शन्मुघन दुसऱ्या स्थानावर आहे. कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेने (३९)  चौथ्या फेरीत तिसरे स्थान पटकावून या चढाओढीत स्थान कायम राखले.

Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Captains Salary List in IPL 2024
IPL 2024 : धोनी-पंड्या नव्हे, ‘हा’ कर्णधार घेतोय सर्वाधिक पैसे, आयपीएलच्या बक्षिसापेक्षा जास्त आहे मानधन
MS Dhoni incredible records as Chennai Super Kings captain
MS Dhoni: २३५ सामने, १० फायनल अन् पाच जेतेपद, धोनीच्या नावावर अद्भुत विक्रम

शनिवारी पहिल्या दोन फेरीत नयनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. गाडीतल्या तांत्रिक बिघाडात सुधारणा करून नयनने रविवारी पुनरागन केले. सकाळच्या सत्रात पार पडलेल्या तिसऱ्या फेरीत दोन जलद लॅपवेळ नोंदवत त्याने १६ मिनिटे ०३.९६० सेकंदासह जेतेपद पटकावले. तामिळनाडूच्या अजय किनी (१६:०९.०७४) आणि कर्नाटकच्या अनंत (१६:१०.५६५) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

चौथ्या फेरीत नयन व अनंत यांच्यात कमालीची चुरस पाहायला मिळणे अपेक्षित होते. सुरुवातीपासून अखेरच्या लॅपपर्यंत नयनला अनंतने कडवे आव्हान दिले. अवघ्या ०.८९२ सेकंदाच्या फरकाने नयनने विजय मिळवला.

‘अनंतने कडवी टक्कर दिली. अखेरच्या लॅपपर्यंत अटीतटीचा सामना झाला. त्यामुळे या विजयाचा आनंदही द्विगुणित झाला,’ अशी प्रतिक्रिया नयनने दिली. त्याने १६ मिनिटे २४.६९० सेकंदात शर्यत पूर्ण करत चौथी फेरी जिंकली. अनंतला १६ मिनिटे २५.५७२ सेकंदांचा कालावधी लागला.

पात्रता आणि तिन्ही फेरीतले अपयश झटकून ध्रुवने (१६:३१.०४२) अखेरच्या फेरीत तिसरे स्थान पटकावले. पहिल्याच लॅपमध्ये वळणावर तीन गाडय़ा एकमेकांना धडकल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या अपघातातून ध्रुव थोडक्यात बचावला. ‘पहिल्याच वळणावर माझ्या पुढे असलेल्या गाडय़ा एकमेकांवर आदळल्या. त्या क्षणी काय करावे सुचले नाही आणि मी गाडीचा वेग कमी करून उजव्या बाजूला जाणे पसंत केले. सुदैवाने मी बचावलो,’ असे ध्रुव म्हणाला.

अन्य निकाल : एलजीबी फॉम्र्युला-४

सकाळचे सत्र : १. राघुल रंगासामी, २. विष्णू प्रसाद, ३. दिलजिथ टी. एस. दुपारचे सत्र : १. विष्णू प्रसाद, २. राघुल रंगासामी, ३. रोहित खन्ना.  जेके टुअरिंग कार : १. आशीष रामास्वामी, २. दीपक चिन्नप्पा, ३. राजाराम सी.