News Flash

मुंबई इंडियन्सचा अभावग्रस्त मुलांसाठी उपक्रम

‘एज्युकेशन फॉर ऑल’ या उपक्रमाचा भाग म्हणून मुंबई इंडियन्स संघाने पुढचा अर्थात शनिवारी पुणे वॉरियर्सविरुद्धचा सामना अभावग्रस्त मुलांना समर्पित केला आहे. या उपक्रमाअंतर्गत सचिन तेंडुलकर

| April 12, 2013 05:38 am

‘एज्युकेशन फॉर ऑल’ या उपक्रमाचा भाग म्हणून मुंबई इंडियन्स संघाने पुढचा अर्थात शनिवारी पुणे वॉरियर्सविरुद्धचा सामना अभावग्रस्त मुलांना समर्पित केला आहे. या उपक्रमाअंतर्गत सचिन तेंडुलकर आणि सहकाऱ्यांनी अभावग्रस्त मुलांची भेट घेतली. या मुलांबरोबर व्यतीत केलेले क्षण संस्मरणीय असल्याचे सचिनने सांगितले. ११,००० अभावग्रस्त मुलं मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहणार आहेत. हा सामना त्यांच्याकरताच खेळू असे सचिनने सांगितले. मुंबई इंडियन्स आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून हा भावनिक क्षण असल्याचे रिकी पॉन्टिंगने सांगितले. या प्रत्येकाची कहाणी ऐकणे हा विलक्षण अनुभव आहे. या मुलांनी जे करून दाखवले आहे ते अभिमानास्पद आहे. या मुलांसाठी आम्ही खेळणार आहोत आणि हा सामना जिंकण्यासाठी नेहमीप्रमाणेच सर्वोत्तम प्रयत्न करू असा विश्वास पॉन्टिंगने व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 5:38 am

Web Title: project of mumbai indians for dearth affected child
टॅग : Ipl,Sports
Next Stories
1 बार्सिलोना उपांत्य फेरीत
2 .. आणि निर्धार वज्राहूनही कठोर झाला
3 अहमदनगर हीरोजची विजयी सलामी
Just Now!
X