04 June 2020

News Flash

स्पेन दौऱ्यासाठी राणी रामपालकडे भारतीय महिला हॉकी संघाचं नेतृत्व

भारतीय महिला संघ 4 सामन्यांची मालिका खेळणार

राणी रामपाल, भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार (संग्रहीत छायाचित्र)

26 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाच्या स्पेन दौऱ्यासाठी, हॉकी इंडियाने 18 सदस्यीस भारतीय संघाची घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलं असून गोलकिपर सविता भारतीय संघाची उप-कर्णधार म्हणून काम पाहणार आहेत. या दौऱ्यात भारतीय महिला संघ स्पेनविरुद्ध 4 तर विश्वचषक उप-विजेत्या आयर्लंडविरुद्ध दोन सामने खेळणार आहे.

स्पेन दौऱ्यासाठी असा असेल भारताचा महिला हॉ़की संघ –

गोलकिपर – सविता, रजनी एटीमाप्रु

बचावफळी – रिना खोखर, दिप ग्रेस एक्का, सलिमा टेटे, निक्की प्रधान, गुरजीत कौर, सुशीला चानू

मधली फळी – लिलिमा मिन्झ, करिष्मा यादव, सोनिका, नेहा गोयल

आघाडीची फळी – राणी, वंदना कटारिया, नवनीत कौर, लारेमिसामी, उदीता, नवजोत कौर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2019 10:52 am

Web Title: rani to lead indian womens hockey team for spain tour
Next Stories
1 जाणूनबुजून टीका कराल तर मी देखील शांत राहणार नाही – रवी शास्त्री
2 Video : हा चेंडू पकडा, नाहीतर म्हणाल निवृत्त होतोयस का?
3 IND vs AUS : …आणि धोनीने तिसऱ्यांदा केला ‘हा’ पराक्रम
Just Now!
X