10 August 2020

News Flash

IPL 2019 : RCB ची ‘स्टेन’गन थंडावली, खांद्याच्या दुखापतीमुळे माघार

आम्हाला स्टेनची उणीव भासेल - RCB

आयपीएलच्या बाराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासमोरचं संकट काही केल्या कमी होत नाहीयेत. नॅथन कुल्टर-नाईलच्या बदलात संघात जागा मिळालेल्या डेल स्टेननेही दुखापतीमुळे माघार घेतली आहे. स्टेनच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे, उरलेला हंगाम स्टेन सामने खेळू शकणार नाहीये. बंगळुरुच्या गेल्या दोन सामन्यांमधली विजयात स्टेनने महत्वाची भूमिका बजावली होती.

“स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे यापुढील कोणत्याही सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाहीये. स्टेन संघात असल्याचा संपूर्ण खेळाडूंना फायदा झाला होता. त्याची उणीव आम्हाला नक्कीच भासेल, तो लवकर बरा होवो अशी आम्ही प्रार्थना करतो.” बंगळुरुच्या संघाने स्टेनच्या दुखापतीबद्दल माहिती दिली.

बाराव्या हंगामात बंगळुरुकडून दोन सामन्यांमध्ये स्टेनने ४ बळी घेतले. स्टेनच्या पुनरागमनामुळे बंगळुरुच्या गोलंदाजांची कामगिरी काहीप्रमाणात सुधारली. त्यामुळे स्टेनच्या अनुपस्थितीत बंगळुरुचे गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2019 4:07 pm

Web Title: rcb speedster dale steyn ruled out of rest of ipl 2019 due to shoulder inflammation
टॅग IPL 2019
Next Stories
1 Video : विराटच्या ‘या’ कृतीने अश्विनचा तिळपापड; मैदानातच असा व्यक्त केला राग
2 ISSF World Cup : अंजुम मुद्गील, दिव्यांश सिंहला सुवर्णपदक
3 ऐतिहासिक! मराठमोळ्या कर्णधाराने अमेरिकेला मिळवून दिला एकदिवसीय संघाचा दर्जा
Just Now!
X