News Flash

RR vs DC : अप्रतिम पराग! भन्नाट थ्रोवर दिल्लीच्या कर्णधारालाच धाडलं मघारी!

रियान परागनं रिषभ पंतला अप्रतिम क्षेत्ररक्षण करत धावचीत केलं!

IPL 2021 च्या यंदाच्या मोसमात सुरुवातीपासून काही सुमार क्षेत्ररक्षणाची उदाहरणं पाहायला मिळाली. अनेकदा सामान्य झेल देखील सुटल्याचं पाहायला मिळालं, तर खराब क्षेत्ररक्षणामुळे अतिरिक्त धावा देखील गेल्याचं दिसून आलं. पण आयपीएलच्या सातव्या दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यामध्ये राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांनी काही अप्रतिम क्षेत्ररक्षणाचे नमुनेच सादर केले. यामध्ये खुद्द कर्णधार संजू सॅमसननं शिखर धवनचा यष्ट्यांच्या मागे घेतलेला अप्रतिम झेल चर्चेत राहिला. पण त्याहून जास्त चर्चा झाली ती रियान परागनं दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला धावचीत केल्यानंतर केलेल्या बिहू नृत्याची! आनंदाच्या क्षणी रियान परागला बिहू हे पारंपरित नृत्य करताना अनेकदा पाहिलं गेलं आहे. पण यावेळी चक्क दिल्लीच्या कर्णधाराचीच महत्त्वाची विकेट घेतल्यानंतर त्याच्या बिहू नृत्याचा आनंद काही औरच होता!

RR vs DC : संजू सॅमसनची पुन्हा कमाल; शिखर धवनचा घेतला अफलातून झेल!

रिषभ पंतनं सावरला होता दिल्लीचा डाव!

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय सार्थ ठरवत राजस्थानच्या गोलंदाजांनी दिल्लीची फलंदाजी अक्षरश: कापून काढली. विशेषत: जयदेव उनाडकटनं ४ ओव्हरमध्ये अवघ्या १५ धावा देऊन ३ फलंदाजांना माघारी पाठवलं. पण त्यानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतनं आपल्या फलंदाजीच्या जोरावर दिल्लीचा डाव सावरला. अवघ्या ३० धावांमध्ये रिषभ पंतनं अर्धशतक झळकावत दिल्लीच्या डावाला आकार दिला. त्यामुळे रिषभ पंत राजस्थानच्या आडाख्यांना उद्ध्वस्त करणार की काय, असं वाटत होतं. त्याच वेळी रियान परागनं आपल्याच गोलंदाजीवर अफलातून थ्रो करत रिषभ पंतला बाद करत संघासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली!

 

IPL 2021 : सनरायजर्सच्या पराभवानंतर ‘या’ तरुणीचे फोटो व्हायरल! कोण आहे ही तरुणी?

…आणि रिषभ पंतसमोर यष्ट्या झाल्या उद्ध्वस्त!

तेराव्या ओव्हरमध्ये रियान परागच्या गोलंदाजीवर पहिल्या तिन्ही चेंडूंवर एकेरी धाव घेत दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केली. मात्र, चौथ्या चेंडूवर तशीच एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेला रिषभ पंत रियान परागच्या जाळ्यात अडकला. रिषभ पंतनं एकेरी धाव घेण्यासाठी मारलेला चेंडू रियान परागनं चपळाईने अडवला आणि तितक्याच वेगाने मागे फिरून एकच यष्टी दिसत असतानाही अचूक थ्रो केला. क्रीजच्या बाहेरच राहिलेल्या रिषभ पंतसमोर यष्ट्या आणि दिल्ली कॅपिटल्सचे मोठ्या धावसंख्येचे आडाखे देखील उद्ध्वस्त झाल्याचं दिसू लागलं होतं.

 

रिषभ पंतला बाद केल्यानंतर रियान परागनं आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बिहू नृत्याची झलक दाखवत सेलिब्रेशन केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 9:44 pm

Web Title: riyan parag dance after rishabh pant run out in rr vs dc ipl 2021 match pmw 88
टॅग : Cricket News,Ipl,IPL 2021
Next Stories
1 विराट कोहलीचा संघ IPL गुणतालिकेत अव्वल; नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट मीम्स
2 RR vs DC : संजू सॅमसनची पुन्हा कमाल; शिखर धवनचा घेतला अफलातून झेल! व्हिडीओ व्हायरल
3 IPL 2021 : हर्षल पटेलला ‘त्या’ बॉलनंतरही थांबवलं का नाही? वॉर्नर भडकला, पण हेड कोचने खरा नियम सांगितला!
Just Now!
X