या मोसमात जेतेपदासाठी झगडणाऱ्या सायना नेहवालसाठी प्रत्येक स्पर्धेगणिक परिस्थिती फारच गंभीर होत चालली आहे. मोसमातील अखेरच्या बीडब्ल्यूएफ जागतिक सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे तिचे या स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले आहे. क्वालालम्पूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील ब गटातील तिसऱ्या लढतीत सायनाला चीनच्या झुरेई ली हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.
जपानच्या मिनात्सू मितानी हिच्याकडून पराभूत झाल्यानंतर सायनाला ऑलिम्पिक विजेत्या झुरेईने २७ मिनिटे रंगलेल्या लढतीत ९-२१, १४-२१ असे सहज हरवले. या पराभवामुळे सायनाच्या उपांत्य फेरीत मजल मारण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. कोरियाच्या येओन जू बे हिने सायनाचे स्पर्धेतील आव्हान कायम राखले. येओन बे हिने मितानीचा २१-१०, २१-१८ असा पराभव करत सायनाला दिलासा दिला आहे. आता शुक्रवारी सायनाला येओन बे हिला सामोरे जावे लागेल. या सामन्यात सायनाने विजय मिळवला आणि झुरेईने मितानीला हरवले तर गटातील दुसऱ्या क्रमांकासाठी तिहेरी लढत रंगणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2013 रोजी प्रकाशित
जागतिक सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचा दुसरा पराभव
या मोसमात जेतेपदासाठी झगडणाऱ्या सायना नेहवालसाठी प्रत्येक स्पर्धेगणिक परिस्थिती फारच गंभीर होत चालली आहे.

First published on: 13-12-2013 at 03:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal loses second match in super series finals