06 March 2021

News Flash

जाणून घ्या वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

४ ऑक्टोबरपासून मालिकेला सुरुवात होणार

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यातला एक क्षण (संग्रहीत छायाचित्र)

सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला ऑक्टोबर महिन्यात घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजशी सामना करायचा आहे. या दौऱ्यात भारत वेस्ट इंडिजविरुद्ध २ कसोटी, ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहेत. दोन कसोटी सामन्यांसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने आपला १५ जणांचा संघही जाहीर केला आहे.

अवश्य वाचा – भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

यादरम्यान भारतीय संघाची चांगलीच दमछाक होणार आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आशिया चषकासाठी युएईला रवाना होईल. या स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहचल्यास (२८ सप्टेंबर) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी तयार व्हायला भारताकडे अवघे ५ दिवस शिल्लक राहणार आहेत. आज वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे.

कसोटी मालिका –

पहिली कसोटी : ४ ते ८ ऑक्टोबर (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट)

दुसरी कसोटी : १२ ते १६ ऑक्टोबर (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)
————————————————-
वन-डे मालिका –

पहिला वन-डे सामना : २१ ऑक्टोबर (बारसपारा मैदान, गुवाहटी)

दुसरा वन-डे सामना : २४ ऑक्टोबर (होळकर मैदान, इंदूर)

तिसरा वन-डे सामना : २७ ऑक्टोबर (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे)

चौथा वन-डे सामना : २९ ऑक्टोबर (वानखेडे मैदान, मुंबई)

पाचवा वन-डे सामना : १ नोव्हेंर (ग्रिनफिल्ड मैदान, थिरुअनंतपुरम)
—————————————————
टी-२० मालिका –

पहिला टी-२० सामना : ४ नोव्हेंबर (इडन गार्डन्स, कोलकाता)

दुसरा टी-२० सामना : ६ नोव्हेंबर (कानपूर/लखनऊ)

तिसरा टी-२० सामना : ११ नोव्हेंबर (चेपॉक मैदान, चेन्नई)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 11:17 am

Web Title: schedule announced for west indies tour of india 2018
Next Stories
1 फक्त सहा धावा अन् विराट मोडणार सचिनचा विक्रम
2 MCA वर प्रशासक म्हणून काम करण्यास रस नाही, धमकीच्या ई-मेलमुळे निवृत्त न्यायाधिशांचा पवित्रा
3 भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर
Just Now!
X