27 September 2020

News Flash

स्लोव्हेनियाच्या तामराची विजेतेपदाला गवसणी

पहिल्या सेटमध्ये तामराने आक्रमक खेळ करत पहिल्याच गेममध्ये कारमानची सव्‍‌र्हिस रोखली आणि २-० अशी आघाडी घेतली.

(संग्रहित छायाचित्र)

आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा

बीव्हीजी पुणे खुल्या आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेच्या एकेरीत स्लोव्हेनियाच्या तामरा झिदनसेक हिने भारताच्या कारमान कौर थंडीचा ६-३, ६-४ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगलेल्या अंतिम फेरीत अव्वल मानांकित झिदनसेकने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत चौथ्या मानांकित कारमानवर १ तास २९ मिनिटांत मात करून विजेतेपद पटकावले. पहिल्या सेटमध्ये तामराने आक्रमक खेळ करत पहिल्याच गेममध्ये कारमानची सव्‍‌र्हिस रोखली आणि २-० अशी आघाडी घेतली. नवव्या गेममध्येही झिदनसेकने कारमानची पुन्हा एकदा सव्‍‌र्हिस भेदत हा सेट ६-३ असा जिंकत आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. ५-४ अशा परिस्थिती असताना १०व्या गेममध्ये तामराने कारमानची सव्‍‌र्हिस भेदली व हा सेट ६-४ असाजिंकून विजेतेपदावर नाव कोरले. तामरा म्हणाली की, विजेतेपद पटकावल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. कारमान एक उत्कृष्ट खेळाडू असून तिच्यासोबतची लढत चुरशीची झाली.

विजेतेपद मिळवणारी तामरा झिदनसेक (डावीकडे) व कारमान कौर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2018 2:31 am

Web Title: slovenia tamara zidansek win silver medal
Next Stories
1 भारताची सध्याची गोलंदाजी सर्वोत्तम -लॉसन
2 विजय, राहुल यांना अखेर सूर गवसला
3 मानापमान नाटय़!
Just Now!
X