वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये भारताचा पराभव झाल्यापासून विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एकीकडे काहीजण ३३ विजय मिळवणारा विराट कोहली कसोटीमधील यशस्वी कर्णधार असल्याचं म्हणत असून दुसरीकेड काहीजण विराटने आता कर्णधारपद वाटून घेण्यासंबधी सल्ला दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सुरेश रैनानेही विराट कोहलीच्या कर्णधारपदावर आपलं मत मांडलं आहे. विराट कोहलीला अजून वेळ देण्याची गरज असल्याचं सुरैश रैनाने म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने तीन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी हुकली आहे. २०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ वर्ल्ड कप आणि नुकतीच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये भारताने अखेरपर्यंत मजल मारली, पण विजय मिळवू शकला नाही. दरम्यान तीन वर्ल्ड कप होणार असून विराट कोहली आणि भारत संघ एक तरी आयसीसी ट्रॉफी जिंकेल असा विश्वास सुरेश रैनाने व्यक्त केला आहे.

धोनी, विराटनंतर ऋषभ पंत असणार भारताचा नवा कर्णधार?

“मला वाटतं विराट कोहली पहिल्या क्रमांकाचा कर्णधार आहे. त्याच्या रेकॉर्डवरुन त्याने मिळवलेलं यश सिद्ध होतं. मला वाटतं तो जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. तुम्ही आयसीसी ट्रॉफीबद्दल बोलत आहात, पण त्याने अजून एकही आयपीएल जिंकलेली नाही. मला वाटतं त्याला अजून थोडा वेळ द्यायला हवा. दोन ते तीन वर्ल्ड कप आता एकामागोमाग एक होणार आहेत. टी-२० वर्ल्ड कप आणि त्यानंतर ५० षटकांचा वर्ल्ड कप होईल. फायनलमध्ये पोहोचणं सोपं नाही, अनेकदा आपण काही छोट्या संधी गमावतो,” असं सुरेश रैनाने न्यूज २४ शी बोलताना म्हटलं आहे.

जानेवारी २०२२ पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी, टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक

दरम्यान यावेळी सुरेश रैनाने भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्यानेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये पराभव झाल्याकडे लक्ष वेधलं. पावसामुळे दोन दिवस वाया गेल्यानंतरही सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला. भारताच्या वरिष्ठ फलंदाजांनी यावेळी जबाबदारीने खेळणं गरजेचं होतं असं स्पष्ट मत सुरेश रैनाने व्यक्त केलं आहे.

“आपण चोकर्स नाही…१९८३ आणि २०११ चा तसंच टी-२० वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहे. खेळाडू खूप मेहनत आणि प्रशिक्षण घेत आहेत हे समजून घेतलं पाहिजे. वर्ल्ड कप जवळ येत असून कोणीही त्यांनी चोकर्स म्हणेल असं वाटत नाही. त्यांना वेळ दिला पाहिजे. ते चांगली कामगिरी करत असून विराटकडे क्षमता आहे. आपण त्याच्या टीम स्टाईलचं कौतुक केलं पाहिजे. पुढील १२ ते १६ महिन्यात आयसीसी ट्रॉफी भारतात येईल असं मला वाटतं,” असं सुऱेश रैनाने सांगितलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suresh raina take on virat kohli captaincy says he has not even won an ipl yet sgy
First published on: 12-07-2021 at 15:53 IST