बार्सिलोना : रेयाल माद्रिदच्या विजयात व्हिडियो असिस्टंट रेफरी (व्हीएआर) हे तंत्रज्ञान निर्णायक ठरले. त्यामुळे रेयाल माद्रिदला ला-लीगा फु टबॉलमध्ये शनिवारी मध्यरात्री रेयाल बेटिसवर ३-२ असा विजय मिळवता आला.
मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडू मार्क बार्टाच्या हाताला चेंडू स्पर्श करून गेल्याचे पंचांच्या निदर्शनास आले नाही. त्यामुळे ‘व्हीएआर’ तंत्रज्ञानाचा अवलंब के ल्यानंतर ८२व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचा फायदा उचलत सर्जियो रामोसने महत्त्वपूर्ण गोल करत रेयाल माद्रिदच्या विजयात योगदान दिले.
फेडेरिको वाल्वेर्डे याने चौथ्या मिनिटालाच गोल करत माद्रिदला आघाडी मिळवून दिली. पण आयसा मंडीने ३५व्या तर विलियम काव्र्हालोने ३७व्या मिनिटाला गोल करत बेटिसला २-१ असे आघाडीवर आणले. पण ४८व्या मिनिटाला एमरसनच्या स्वयंगोलमुळे माद्रिदला २-२ असे पुनरागमन करता आले. त्यातच बेटिसला ६७व्या मिनिटाला धक्का बसला. त्यांच्या एमरसनला पंचांनी लाल कार्ड दाखवत मैदानाबाहेर धाडले.
इंटर मिलानची फ्योरेंटिनावर मात
अखेरच्या तीन मिनिटांत के लेल्या दोन गोलमुळे इंटर मिलानने सेरी-ए फु टबॉल स्पर्धेत फ्योरेंटिनावर ४-३ असा विजय मिळवला. इंटर मिलानच्या विजयात लॉटारो मार्टिनेझ, फे डेरिको चेचेरिनी, रोमेलु लुकाकू तसेच डॅनिलो डीअॅम्ब्रोसियो यांचे योगदान राहिले. फ्योरेंटिनाकडून ख्रिस्तियन कोआमे, गेटानो कॅ स्ट्रोविली आणि फे डेरिको चिएसा यांनी गोल केले.