News Flash

Ind vs WI : शार्दुल ठाकूर ऐवजी उमेश यादवला वन-डे संघात स्थान

शार्दुल दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त

उमेश यादव (संग्रहीत छायाचित्र)

विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केलेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरला आपलं वन-डे संघातलं स्थानही गमवावं लागलं आहे. हैदराबाद कसोटीत केवळ 10 चेंडू टाकल्यानंतर शार्दुलला दुखापत झाली होती, त्यामुळे पुढे तो गोलंदाजी करु शकला नाही. त्यामुळे बीसीसीआयने खबदारीचा उपाय म्हणून उमेश यादवची पहिल्या दोन वन-डे सामन्यांसाठी संघात निवड केली आहे. उमेश यादवने हैदराबाद कसोटी सामन्यात 10 बळी घेतले होते. याआधीही आशिया चषकात शार्दुल ठाकूरला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2018 6:25 pm

Web Title: umesh yadav to replace shardul thakur for first two west indies odis
Next Stories
1 बीसीसीआय ढोंगी, पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांचा खोचक टोला
2 IND vs WI : विंडीजचे प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांचे निलंबन
3 Pro Kabaddi Season 6 : मराठी बचावपटू ठरले High 5
Just Now!
X