महेंद्रसिंह धोनीचे बालपणीचे प्रशिक्षक केशब रंजन बॅनर्जी यांनी विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात होणाऱ्या तुलनेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने धोनीकडून धडे घेणं गरजेचं असल्याचं वक्तव्य बॅनर्जींनी केलं आहे. ते पश्चिम बंगालमधील अंदुल शहरात महेंद्रसिंह धोनी क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

अवश्य वाचा – हार्दिक पांड्यावर दबाव टाकणं अयोग्य – कपिल देव

“सामन्यात कोणत्या क्षणी काय निर्णय घ्यावी याची धोनीला योग्य जाण आहे. काही सामन्यांमध्ये कोहली सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असताना आणि धोनी गोलंदाज-क्षेत्ररक्षकांना सुचना देताना आपण पाहिलं आहे. त्यामुळे धोनी हा विराटपेक्षा कधीही उजवा आहे. धोनीकडे असणारे काही गूण अजुनही विराटकडे नाहीत. जर भारतीय संघात धोनी नसेल तर विराटला कोणीही मदत करणारा खेळाडू नाहीये. विराटने यासाठी धोनीकडून धडे घेणं गरजेचं आहे.” बॅनर्जी यांनी आपलं परखड मत मांडलं.

विराटला कर्णधार म्हणून स्वतःची कामगिरी सुधारण्यामध्ये आणखी कालावधी लागेल. यासाठी त्याला धोनीची गरज लागणार आहे. बॅनर्जी क्रिकेट अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी धोनीने विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं असंही बॅनर्जी यांनी सांगितलं. ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ५ जून रोजी भारताची पहिली लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

अवश्य वाचा – सांभाळून रहा, तुझ्या झिवाला पळवून नेईन ! जाणून घ्या कोणी दिली धोनीला धमकी