02 December 2020

News Flash

पंतला संधी नाकारल्यामुळे सेहवाग नाराज, टीम इंडियाच्या संघनिवडीवर उभं केलं प्रश्नचिन्ह

संधी दिली नाही तर तो धावा कशा करेल?

महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी मिळालेल्या ऋषभ पंतने निराशा केली. फलंदाजीतलं अपयश आणि यष्टींमागची सुमार कामगिरी यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने नवीन वर्षात प्रयोग करत लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची संधी दिली. कसोटी मालिकेतही भारताने पंतऐवजी अनुभव वृद्धीमान साहाचा पर्याय निवडला. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर, राखीव खेळाडूंना संघात संधी मिळेल अशी आशा होती, मात्र चौथ्या टी-२० सामन्यातही पंतला संधी मिळाली नाही. भारतीय संघाच्या या निवडीवर माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग नाराज झालेला आहे.

अवश्य वाचा – व्हाईटवॉशच्या उद्देशाने आम्ही मैदानात उतरु – मनिष पांडे

चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शमीला विश्रांती देत संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनीला संधी दिली. यावेळी ऋषभ पंतला संधी न दिल्यामुळे सेहवागने नाराजी व्यक्त केली आहे. “जर ऋषभला संघात संधीच दिली नाही तर तो धावा कशा करेल?? तुम्ही सचिन तेंडुलकरला राखीव खेळाडूंमध्ये बसवलत तर तो देखील धावा करु शकणार नाही. जर पंत तुम्हाला Match Winner खेळाडू वाटत असेल तर त्याला खेळवत का नाही?? कामगिरीतली अनियमितता हे एकमेव कारण आहे का?” Cricbuzz संकेतस्थळाच्या कार्यक्रमात बोलत असताना सेहवागने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – मोहम्मद शमी सध्याच्या घडीला जगातला सर्वोत्तम गोलंदाज – शोएब अख्तर

दरम्यान ५ सामन्यांच्या मालिकेत भारताकडे सध्या ४-० अशी आघाडी आहे…त्यामुळे अखेरच्या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे. त्यामुळे अखेरच्या सामन्यातही पंतला संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : थरारक सामन्यात बाजी मारुनही भारतीय संघाला दंड, जाणून घ्या कारण…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2020 4:44 pm

Web Title: virendra sehwag questions the team management on dropping rishabh pant from the playing xi psd 91
टॅग Rishabh Pant
Next Stories
1 न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून हार्दिक पांड्या संघाबाहेर
2 Ind vs NZ : थरारक सामन्यात बाजी मारुनही भारतीय संघाला दंड, जाणून घ्या कारण…
3 मोहम्मद शमी सध्याच्या घडीला जगातला सर्वोत्तम गोलंदाज – शोएब अख्तर
Just Now!
X