01 March 2021

News Flash

अनिल कुंबळे नव्हे जसप्रीत बुमराह; लेग स्पिन पाहून जंबोही झाला हैराण!

पाहा व्हिडीओ

Jasprit Bumrah Video Viral : जसप्रीत बुमरहाच्या यॉर्करपुढे विस्फोटक आणि दिग्गज फलंदाज नांगी टाकतात. पण आता जसप्रीत बुमराहचं आणखी एक कौशल्य समोर आलं आहे. त्याचं हे कौशल्या पाहून अनेकजण हैराण झाल्याशिवाय राहणार नाहीत. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहनं हुबेहुब अनिल कुंबळेच्या गोलंदाजीची नकल केली आहे.

बीसीसीआयनं बुमराहाचा हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलेय, ‘आपण जसप्रीत बुमराहचं सटीक यॉर्कर आणि बाऊन्सर पाहिले असतील. आता पाहा एक वेगवान गोलंदाज फिरकी गोलंदाजी कशी करतो.’


बीसीसीआयनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह अनिल कुंबळेप्रमाणे फिरकी गोलंदाजी करताना दिसत आहे. गोलंदाजी पाहून बुमराह फिरकी गोलंदाज असल्याचं दिसत आहे. बीसीसीआयच्या या व्हिडीओवर अनिल कुंबळेनेही आपलं मत व्यक्त केलं आहे.

कुंबळेने बुमराहचं कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 2:47 pm

Web Title: watch viral video jasprit bumrah copies greatest leg spinner anil kumble action nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतरही वॉर्नरची मुलगी आहे खूश, कारण….
2 आकडे इंग्लंडचे, नवी चिन्हे भारताची
3 IND vs ENG : इंग्लंडविरोधात सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कोण?; विराट-सेहवागचं नाव नाही
Just Now!
X