News Flash

पुजारा, रोहितला रणजीसाठी सोडणार नाही -बीसीसीआय

वानखेडेवर रणजी क्रिकेट करंडकाचा अंतिम सामना होणार असून यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) भारतीय संघातील रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना स्थानिक संघातून खेळण्याची परवानगी

| January 22, 2013 12:11 pm

वानखेडेवर रणजी क्रिकेट करंडकाचा अंतिम सामना होणार असून यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) भारतीय संघातील रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांना स्थानिक संघातून खेळण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) केली होती. या विनंतीवर बीसीसीआयने आपला निर्णय देताना ‘एकदिवसीय मालिका सुरू असताना खेळाडूंना स्थानिक सामन्यांसाठी सोडू शकत नाही,’ असे म्हटले आहे. त्यामुळे चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजा यांनाही सौराष्ट्रकडून अंतिम फेरीत खेळता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
जर अजिंक्य आणि रोहित हे दोघेही एकदिवसीय मालिकेत खेळत नसतील तर त्यांना रणजीच्या अंतिम फेरीमध्ये खेळण्याची बीसीसीआयने परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही केली होती, असे एमसीएचे सहसचिव नितीन दलाल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:11 pm

Web Title: we will not send pujara and rohit for ranjee bcci
टॅग : Bcci
Next Stories
1 दिल्लीचे ‘दे दणादण!’
2 ऑस्ट्रेलियातही आर्मस्ट्राँग हा टवाळकीचा विषय
3 भारतास नावलौकिक मिळविण्यासाठी हॉकी इंडिया लीग उपयुक्त : सरदारासिंग
Just Now!
X