01 March 2021

News Flash

Ind vs WI : पहिल्याच कसोटीत भारत डावाने विजयी, तिसऱ्या दिवसात ५ विक्रमांची नोंद

भारत मालिकेत १-० ने आघाडीवर

वेस्ट इंडिजवर मात केल्यानंतर भारतीय संघ

वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने राजकोट कसोटीत पाहुण्या विंडीज संघावर डावाने मात करत मालिकेची धडाक्यात सुरुवात केली आहे. भारताने १ डाव आणि २७२ धावांची सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ १९६ धावांमध्ये आटोपला. भारताकडून दुसऱ्या डावात कुलदीप यादवने ५, रविंद्र जाडेजाने ३ तर रविचंद्रन आश्विन २ विकेट घेतल्या. या मालिकेतला दुसरा सामना १२ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरु होणार आहे. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी तब्बल ५ विक्रमांची नोंद करण्यात आली.

अवश्य वाचा – Ind vs WI : पहिलं शतक आईला समर्पित – रविंद्र जाडेजा

१ – कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारा कुलदीप यादव पहिला डावखुरा फिरकीपटू ठरला आहे. याचसोबत इम्रान ताहीर आणि अजंता मेंडीस यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा कुलदीप तिसरा फिरकीपटू ठरलाय.

२ – घरच्या मैदानावर भारताला सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर. विराटने भारताला १४ विजय मिळवून दिले आहेत. सध्या महेंद्रसिंह धोनी २१ विजयांसह पहिल्या स्थानावर आहे.

६ – पदार्पणाच्या सामन्यात सामनावीराचा किताब मिळवणारा पृथ्वी शॉ सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी प्रविण आमरे, आर.पी.सिंह, रविचंद्रन आश्विन, शिखर धवन, रोहित शर्मा यांनी अशी कामगिरी केली आहे.

१०० – भारतीय संघाचा घरच्या मैदानावरचा हा शंभरावा विजय ठरला. अशी कामगिरी करणारा भारत चौथा संघ ठरला आहे.

२७२ – विंडिजवर १ डाव आणि २७२ धावांनी मिळवलेला विजय हा भारताचा कसोटी क्रिकेटमधला सर्वात मोठा विजय ठरला आहे. याआधी भारताने अफगाणिस्तानला बंगळुरु कसोटीत १ डाव २६२ धावांनी हरवलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 4:06 pm

Web Title: west indies tour of india 2018 these 5 records were broke by team india during 3rd day of 1st test
Next Stories
1 Ind vs WI : पहिलं शतक आईला समर्पित – रविंद्र जाडेजा
2 Ind vs WI : दुसऱ्या दिवशीच्या शतकी खेळीत विराट कोहलीकडून ९ विक्रमांची नोंद, जाणून घ्या…
3 राजकोट कसोटीत भारत डावाने विजयी, मालिकेत १-० ने आघाडी
Just Now!
X