Women’s T20 World Cup 2020 IND vs AUS : अनुभवी फिरकीपटू पूनम यादव हिच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धावांनी पराभूत केले. जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९*) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

२ स्टंपिंग अन् २ झेल… तानियाने केली धमाकेदार कामगिरी

१३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी सावध सुरूवात केली आणि पहिल्या ५ षटकांत ३० धावांची भागीदारी केली. संयमी सुरूवातीनंतर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. अडखळती सुरूवात करत १३ चेंडूत ६ धावा करणारी बेथ मूनी माघारी परतली. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगदेखील स्वस्तात माघारी परतली. सलामीवीर हेली दमदार अर्धशतकानंतर माघारी परतली. हेलीने ३५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५१ धावा केल्या. पण त्यानंतर ती लगेचच झेलबाद झाली.

धक्कादायक! महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या

फिरकीपटू पूनम यादवने आपला अनुभव पणाला लावत दोन चेंडूत दोन बळी टिपले. तिने आधी रॅचेल हेन्सला (६) बाद केले. तर त्यानंतर दमदार फलंदाज एलिस पेरीला पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले. पण तिची हॅटट्रिक यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे हुकली. पुढच्या षटकात पूनम यादवने चौथा बळी टिपला आणि ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का दिला. त्यानंतर यजमानांना डोकं वर काढता आलं नाही. अखेर १९.५ षटकात भारताने ऑस्ट्रेलियाला ११५ धावांत बाद केले आणि भारताने विजयी सलामी दिली. पूनम यादवने ४, शिखाने ३ तर गायकवाडने १ बळी टिपला.

भारताच्या स्टार फिरकीपटूचा क्रिकेटला अलविदा

त्याआधी, भारताकडून फलंदाजीसाठी उतरलेली स्मृती मानधना स्वस्तात पायचीत झाली. तर दणकेबाज सुरू केल्यानंतर आपला पहिला टी २० विश्वचषक सामना खेळणारी शफाली वर्माही फटकेबाजीच्या प्रयत्नात माघारी परतली. शफालीने धमाकेदार खेळी करत ५ चौकार आणि १ षटकार लगावला, पण १५ चेंडूत २९ धावा करून ती बाद झाली. भारताची अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौर पाठोपाठ मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाली आणि भारताला तिसरा धक्का बसला. तिला केवळ २ धावाच करता आल्या.

तीन बळी झटपट बाद झाल्याने मुंबईकर रॉड्रीग्जने दिप्ती शर्मासोबत सावध खेळ केला. त्या दोघींनी डावाला आकार दिला. पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात अखेर रॉड्रीग्ज माघारी परतली. तिने ३३ चेंडूत २६ धावा केल्या. दिप्ती शर्माने मात्र शेवटपर्यंत झुंज दिली आणि नाबाद ४९ धावा केल्या.

Live Blog

16:42 (IST)21 Feb 2020
पूनमच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; भारताची विजयी सलामी

अनुभवी फिरकीपटू पूनम यादव हिच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धावांनी पराभूत केले. जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९*) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

16:21 (IST)21 Feb 2020
शिखा पांडेचा दुसरा बळी; ऑस्ट्रेलियाचं 'टेन्शन' वाढलं

शिखा पांडेचा दुसरा बळी; ऑस्ट्रेलियाचं 'टेन्शन' वाढलं

16:09 (IST)21 Feb 2020
पूनम यादवचा चौथा बळी; ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

पूनम यादवचा चौथा बळी; ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का

16:01 (IST)21 Feb 2020
पूनम यादवचे दोन चेंडूत दोन बळी

फिरकीपटू पूनम यादवने आपला अनुभव पणाला लावत दोन चेंडूत दोन बळी टिपले. तिने आधी रॅचेल हेन्सला (६) बाद केले. तर त्यानंतर दमदार फलंदाज एलिस पेरीला पहिल्याच चेंडूवर तंबूत धाडले.

15:51 (IST)21 Feb 2020
अर्धशतकानंतर हेली माघारी; ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का

सलामीवीर हेली दमदार अर्धशतकानंतर माघारी परतली. हेलीने ३५ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारासह ५१ धावा केल्या. पण त्यानंतर ती लगेचच झेलबाद झाली.

15:49 (IST)21 Feb 2020
ऑस्ट्रेलियन कर्णधार झेलबाद; लॅनिंग स्वस्तात माघारी

ऑस्ट्रेलियन कर्णधार झेलबाद; लॅनिंग स्वस्तात माघारी

15:33 (IST)21 Feb 2020
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का; बेथ मूनी माघारी

संयमी सुरूवातीनंतर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. अडखळती सुरूवात करत १३ चेंडूत ६ धावा करणारी बेथ मूनी माघारी परतली.

15:30 (IST)21 Feb 2020
ऑस्ट्रेलियाची सावध सुरूवात

१३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी सावध सुरूवात केली आणि पहिल्या ५ षटकांत ३० धावांची भागीदारी केली.

15:16 (IST)21 Feb 2020
ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान

चांगली सुरूवात मिळूनही भारताचा डाव मध्ये अडखळला. त्यानंतर दिप्ती आणि रॉड्रीग्जने झुंजार खेळी केली. रॉड्रीग्जने २६ तर दिप्तीने नाबाद ४९ धावा केल्या. या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले.

14:39 (IST)21 Feb 2020
मुंबईकर रॉड्रीग्ज माघारी; भारताला चौथा धक्का

तीन बळी झटपट बाद झाल्याने मुंबईकर रॉड्रीग्जने दिप्ती शर्मासोबत सावध खेळ केला. त्या दोघींनी डावाला आकार दिला. पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात अखेर रॉड्रीग्ज माघारी परतली. तिने ३३ चेंडूत २६ धावा केल्या.

14:05 (IST)21 Feb 2020
कर्णधार हरमनप्रीत यष्टीचीत

भारताची अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाली आणि भारताला तिसरा धक्का बसला. तिला केवळ २ धावाच करता आल्या.

13:56 (IST)21 Feb 2020
फटकेबाजीच्या प्रयत्नात शफाली माघारी

आपला पहिला टी २० विश्वचषक सामना खेळणारी शफाली वर्मा फटकेबाजीच्या प्रयत्नात माघारी परतली. तिने धमाकेदार खेळी करत ५ चौकार आणि १ षटकार लगावला, पण १५ चेंडूत २९ धावा करून ती बाद झाली.

13:47 (IST)21 Feb 2020
स्मृती मानधना पायचीत, भारताला पहिला धक्का

दणकेबाज सुरू केल्यानंतर स्मृती मानधना पायचीत झाली. तिने २ चौकारांसह १० धावा केल्या.

13:38 (IST)21 Feb 2020
भारतीय संघात तीन फिरकीरपटू

भारताचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधना, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, पूनम यादव.

13:14 (IST)21 Feb 2020
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची प्रथम गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकून प्रथन गोलंदाजीचा निर्णय घेतला.