भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर हल्ला केल्याचा आरोप असलेली सोशल मीडिया इन्फ्लुईन्सर सपना गिल हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पृथ्वी शॉवर हल्ला केल्याचा आरोप सपना गिलवर आहे. सोमवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर सपना गिलची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुरू होणार आहे. मुंबईतील घटनेनंतर ओशिवरा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (१४३, १४८, १४९, ३८४, ४३७, ५०४, ५०६) विविध कलमांखाली अटक केलेल्या ८ लोकांपैकी सपना ही एक आहे.

कथित गुन्ह्यात वापरलेली बेसबॉल बॅट आणि वाहन शोधण्याची गरज असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढवून मागितली होती. पृथ्वी शॉचा मित्र आशिष सुरेंद्र यादव याने फिर्याद दिल्यानंतर मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी सपना गिलसह इतर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत आशिषने म्हटले आहे की, काही लोकांनी त्याच्या कारवर बेसबॉल बॅटने हल्ला केला. त्यानंतर कारचा पाठलाग केला आणि ५०,००० रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास खोट्या केसची धमकीही दिली.

west bengal marathi news, west bengal teachers recruitment scam marathi news
शिक्षक भरती घोटाळ्याच्या छडीचा मार ममता बॅनर्जींना! न्यायालयीन निर्णयाने विरोधकांच्या हाती आयता मुद्दा
India abortion law
गर्भधारणेनंतर ३० आठवड्यांपर्यंत गर्भपातास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; भारतीय गर्भपात कायदा काय आहे?
supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग
Girl Dies After Eating Cake
१० व्या वाढदिवशी खाल्लेल्या केकने चिमुकलीचा मृत्यू, झोमॅटोची हॉटेलवर कारवाई; कुटुंबाने सांगितलं पूर्ण प्रकरण

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पृथ्वी शॉ सांताक्रूझ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. तेव्हा अज्ञात आरोपी तेथे आला आणि त्याने सेल्फीचा आग्रह धरला. शॉने दोघांसोबत सेल्फी काढला, त्यानंतर तोच गट परत आला आणि इतर आरोपींसोबत सेल्फी घेण्यास आग्रह धरू लागला. यावेळी शॉने आपण मित्रांसोबत जेवायला आलो असून त्रास द्यायचा नाही असे सांगून नकार दिला. तक्रारीनुसार, आरोपीने आग्रह केल्यावर पृथ्वी शॉच्या मित्राने हॉटेल मॅनेजरला फोन करून त्यांच्याबद्दल तक्रार केली.

हेही वाचा – IND vs AUS: तिसऱ्या कसोटीपूर्वी सिराज-किशनचा नवीन लूक व्हायरल; एकदा पाहाच स्टायलिश हेअरकटमधील फोटो

बेसबॉल बॅटने हल्ला केला –

तक्रार मिळल्यानंतर मॅनेजर तेथे दाखल झाले त्यांनी आरोपीला हॉटेल सोडण्यास सांगितले. या घटनेनंतर पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र रात्रीचे जेवण करून हॉटेलच्या बाहेर आले, तेव्हा ते लोक बेसबॉलच्या बॅट घेऊन हॉटेलबाहेर उभे होते. त्यांनी पृथ्वीच्या मित्राच्या बीएमडब्ल्यू कारची तोडफोड केली. आरोपींनी बेसबॉल बॅटचा वापर करून वाहनाच्या पुढील व मागील खिडक्या फोडल्या.