A video of fans chanting Jai Shri Ram during the Ind vs Pak match: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १२वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होता, त्यामुळे लाखो चाहते सामना पाहण्यासाठी आले होते. १ लाख २० हजार लोकसंख्या असलेल्या या मैदानावर प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान, ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या. एक लाखांहून अधिक प्रेक्षक जय श्री रामचा नारा देताना दिसले, ज्याचा सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी लाखोंच्या संख्येने लोक स्टेडियमध्ये हजर होते. पाकिस्तानचा संघ फलंदाजी करत होता, त्यावेळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या. हजारो लोक जय श्री रामच्या नावाचा जयघोष करताना दिसले. हे सुंदर दृश्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून लोकांना प्रचंड आवडत आहे.

पाकिस्तानचा संघ १९१ धावांवर आटोपला –

या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पाकिस्तान संघाची साधारण सुरुवात पाहिला मिळाली. पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीने पुन्हा एकदा निराशा केली, सलामीवीर अब्दुल्ला शफीकने २० धावांची खेळी केली, तर इमाम-उल हकने ३८ चेंडूत ३६ धावांचे योगदान दिले. कर्णधार बाबर आझमने ५० धावा केल्या, तर सौद शकीलने ६ धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिझवानने ४९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर आटोपला.

हेही वाचा – IND vs PAK: “त्याच्या हसण्यावर जाऊ नका! तो अत्यंत…”; सचिन तेंडुलकरने सांगितला वकार युनूसविरुद्ध खेळण्याचा अनुभव

मोहम्मद सिराजने पाकिस्तानला दिला पहिला धक्का –

या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पाकिस्तानची सलामीची जोडी फोडली. सिराजने पहिल्याच षटकात ३ चौकार गेल्याने अब्दुल्ला शफीकला बाद केले. त्याचवेळी त्याने कर्णधार बाबर आझमलाही क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सुरुवातीलाच महागात पडल्यानंतर सिराजने भारतीय संघाला शानदार पुनरागमन करुन दिले. टीम इंडियाच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गोलंदाजांमध्ये शार्दुल ठाकूर हा एकमेव असा होता ज्याला एकही यश मिळाले नाही.