IND vs AUS 3rd ODI Match Updates: चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिकेतील तिसार आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथण फलंदाजी करताना ४९ षटकांत सर्वबाद २६९ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला २७० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या दरम्यान रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

रवींद्र जडेजाची गणना केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते. त्यामुळे जेव्हा त्याच्या गोलंदाजीवर एखादा कॅच ड्रॉप होतो, तेव्हा त्याला खूप राग येतो. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात असेच काहीसे पाहायला मिळाले. जडेजाच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने अवघड झेल सोडला.पण यादरम्यान टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी लाइव्ह कॉमेंट्रीदरम्यान जे म्हटले, ते सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
CSK vs LSG : मार्कस स्टॉयनिसच्या शतकाच्या जोरावर लखनऊने चेन्नईचा ६ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ
IPL 2024 Travis Head Breaks Many Records with 89 Runs innings against Delhi Capitals
IPL 2024: ११ चौकार, ६ षटकार, २७८च्या स्ट्राईक रेटने ट्रॅव्हिस हेडने दिल्लीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं! ८९ धावांच्या खेळीत अनेक विक्रम
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ

खरं तर, गावसकर लाइव्ह कॉमेंट्री दरम्यान बोलताना दिसले की, हा एक अवघड झेल आहे. पण त्यानंतर त्यांना जडेजाचे दुखणेही समजले आणि मग ते जे काही बोलेल ते तुमचेही मन जिंकेल. २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिराजने डेव्हिड वॉर्नरचा झेल सोडला. या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला दोन धावा मिळाल्या. सिराजनेही डायव्ह मारली, पण तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि झेलही घेता आला नाही. जे पाहून जडेजा चांगलाच संतापलेला दिसत होता.

हेही वाचा – IND vs AUS 3rd ODI: हार्दिक पांड्याने स्टीव्ह स्मिथला बाद करत रचला मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील दुसराच गोलंदाज

गावसकर ऑन-एअर म्हणाले, “गेल्या दोन-तीन वर्षांत सिराजसोबत आम्ही पाहिले आहे की, त्याच्यामध्ये अजून ती वृत्ती आलेली नाही. या झेलसाठी तो उशीरा धावू लागला. हा एक कठीण झेल होता, तो कोणत्याच बाजूने सोप्पा झेल नव्हता. तो उशिरा धावू लागला, त्यामुळे त्याला डायव्ह मारावी लागली. जडेजाच्या रागाबद्दलही असेच म्हणता येईल, तो तुमच्या दर्जाचा असू शकत नाही. तुमचा दर्जा आकाशाएवढा आहे.”

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कर्णधआर), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज