Aakash Chopra on Rohit Sharma: आयपीएल २०२४पूर्वी अनुभवी फलंदाज रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे. त्याच्या जागी हार्दिक पंड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले असून तो या मोसमातून मुंबई संघात परतला आहे. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “रोहित शर्माने गेल्या १० वर्षात मुंबई इंडियन्स संघाचे खूप चांगले नेतृत्व केले आणि मुंबईला आवश्यक ते सर्व दिले.”

रोहित शर्माने ११ हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आणि ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. २०१३च्या मध्य-मोसमात त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले. तेव्हापासून गेल्या ११ हंगामात मुंबई इंडियन्सला नवीन उंचीवर नेणाऱ्या रोहित शर्माने मागे वळून पाहिलेच नाही. यामुळेच सीएसकेसह मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे.

mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024, GT vs MI: नवा कर्णधार, नवे डावपेच; हार्दिक आणि मुंबई इंडियन्सवर का होतेय टीका?
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024 GT vs MI: “मुंबईचा राजा…” अहमदाबादमध्ये रोहित शर्माच्या चाहत्यांनी केलं हार्दिक पांड्याला ट्रोल, VIDEO व्हायरल

हेही वाचा: Champions Trophy: ठरलं! पाकिस्तान भूषवणार चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद, पीसीबीने आयसीसीबरोबर केला करार

रोहित शर्मा नेहमी संघाला स्वतःच्या पुढे ठेवतो आकाश चोप्रा

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “रोहित शर्मा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक होता. १० वर्षात त्याने पाच ट्रॉफी जिंकल्या, त्यामुळे तो सर्व कर्णधारांमध्ये यशस्वी कर्णधार होता. तो खेळ चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि त्याने एमआयचे उत्कृष्ट नेतृत्व केले. त्याने संघाला नेहमीच स्वतःच्या पुढे ठेवले. संघासाठी सलामीला फलंदाजीला येणे असो किंवा लोअर डाउन ऑर्डरवर खेळणे असो, रोहितने जे काही त्याला सांगितले होते ते सर्व केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जो कोणी खेळला, सर्वांनी त्याचे कौतुक केले. यावरून कर्णधार आणि खेळाडू म्हणून तुमची क्षमता काय होती हे लक्षात येते. मला असे वाटते की, एका शानदार युगाचा अंत झाला आहे.”

हेही वाचा: IND W vs ENG W: म्हारी छोरी छोरोसे..! भारतीय महिला संघाने रचला इतिहास, तब्बल ३४७ धावांनी इंग्लंडला चारली धूळ

रोहितने २०१३ मध्ये कर्णधार म्हणून प्रथमच आयपीएलचे विजेतेपद जिंकले आणि त्यानंतर २०१५, २०१७ , २०१९ आणि २०२० मध्ये आणखी चार किताब जिंकले. रोहितच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्सबरोबर संयुक्तपणे सर्वात यशस्वी संघ बनला आहे. आयपीएलच्या इतिहासात, एम.एस. धोनीशी रोहितने बरोबरी केली आहे. मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा सामील होण्यापूर्वी हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत होता. आता रोहितच्या जागी हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली आहे. हार्दिक पंड्या अचानक गुजरात टायटन्स सोडून आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. याआधी हार्दिकने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएल करिअरची सुरुवात केली होती. हार्दिक २०२१ पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य होता. आयपीएल २०२३ मध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात टायटन्सने त्याला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले. त्याने पहिल्याच सत्रात संघाला चॅम्पियन बनवले आणि यशस्वी कर्णधार म्हणून उदयास आला.