Saba Karim Surya and Ishan are the best options for Team India’s middle order: टीम इंडियाला अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले होते. यापूर्वी भारताने वनडे मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता. मात्र, यामध्येही टीम इंडियाच्या खेळाडूंची कामगिरी चांगली झाली नव्हती. भारतीय संघाचे माजी निवडकर्ता सबा करिम यांनी आशिया कपसाठी टीम इंडियाच्या मधल्या फळीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जर केएल राहुल आणि श्रेयस अय्यर तंदुरुस्त नसतील, तर मधल्या फळीसाठी सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे चांगले पर्याय असू शकतात, असा त्याचा विश्वास आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, सबा करीम म्हणाले, “निवडकर्ते केएल राहुल आणि श्रेयस अय्यर तंदुरुस्त असल्यास त्यांना पर्याय म्हणून पाहू शकतात. त्यांना संधी मिळू शकते. मात्र उशीर झाला तरी २० तारखेपर्यंत संघ घोषित केला जाईल. तोपर्यंतच त्यांच्याकडे वेळ आहे. जर ते फिट नसतील तर इशान किशन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तो सलामीसह मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो.”

सबा करीम पुढे म्हणाला, “जर श्रेयस अय्यर फिट नसेल, तर आणखी दोन-तीन पर्याय आहेत. तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यांना संधी दिली जाऊ शकते. पण मला सूर्यकुमार यादवची निवड करायला आवडेल. त्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचा एकदिवसीय अनुभव आहे. त्यामुळे मला सूर्यकुमारसोबत जायला आवडेल.”

हेही वाचा – Team India: आशिया कपमध्ये रवींद्र जडेजाचा कोण असेल जोडीदार, कुलदीप की चहल? हरभजन सिंगने सांगितले नाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे सूर्याने भारतासाठी आतापर्यंत २६ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान ५११ धावा केल्या आहेत. सूर्याने या फॉरमॅटमध्ये २ अर्धशतके झळकावली आहेत. देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याचा विक्रम चांगला आहे. इशान किशनबद्दल बोलायचे झाले, तर तो भारताकडून १७ वनडे खेळला आहे. यादरम्यान ६९४ धावा केल्या आहेत. इशानने या फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावले आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २१० धावा आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी एक शतक आणि ६ अर्धशतके केली आहेत.