India vs Australia 2023 2nd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारता १० गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी १६ करताना सर्वबाद ११७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ११ षटकांत बिनबाद १२१ धावा केल्या.या सामन्यात भारतीय संघाने आपला निम्मा संघ अवघ्या ४९ धावांत गमावल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाने ११ वर्षानंतर एका नकोशा विक्रमांची पुनरावृत्ती केली आहे.

भारताविरुद्ध वनडे दोनदा १० विकेट्सने विजय मिळवणारा पहिलाच संघ

मिचेल मार्शने ३६ चेंडूत ६६आणि ट्रॅव्हिस हेडने ३०चेंडूत ५१ धावा केल्या. मार्शने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. हेडने १० चौकार मारले. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला आहे. भारताविरुद्ध वनडे दोनदा १० विकेट्सने विजय मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे.

११ वर्षानंतर भारताने पहिल्या १० षटकात पाच विकेट गमावल्या-

या सामन्यात भारताची फलंदाजी खराब झाली. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या १० षटकांत पाच फलंदाज गमावले. या अगोदर भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध २०१२ मध्ये पहिल्या १० षटकात ५ फलंदाज गमावले होते. म्हणजेच ११ वर्षांनंतर भारतीय संघाने या लाजिरवाण्या विक्रमाची पुनरावृत्ती केली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९.२ षटकांत ४९ धावांत ५ विकेट गमावल्या. यामध्ये शुबमन गिल (०), रोहित शर्मा (१३), सूर्यकुमार यादव (०), केएल राहुल (९) आणि हार्दिक पंड्या (१) यांचा समावेश होता.

भारताचे चार फलंदाज शून्यावर बाद –

मिचेल स्टार्कने या सामन्यात शानदार गोलंदाजी करत ५ बळी घेतले. स्टार्कने ८ षटकात ५३ धावा देत ५ बळी घेतले. ज्यामध्ये रोहित शर्मा, शुबमन गिल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद सिराजचा समावेश होता. या सामन्यात भारताचे चार फलंदाज शून्यावर बाद झाले, त्यात सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, मोहम्मद शमी आणि मोहम्म सिराज यांचा समावेश होता.

हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: सूर्यकुमारच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद; ‘या’ खेळाडूंच्या यादीत झाला सामील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियासाठी सीन अॅबॉटने ६ षटकात २३ धावा देताना ३ विकेट घेतल्या. त्याचबरोबर नॅथन एलिसने ५ षटकात १३ धावा देताना २ विकेट घेल्या. भारतीय डावातील सर्व विकेट ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांनी घेतल्या.