India vs South Africa Series: भारत आणि ऑस्टेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील २ सामने पावसामुळे रद्द झाले. दरम्यान भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. ही मालिका झाल्यानंतर भारतीय मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये कसोटी, टी-२० आणि वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी -२० मालिकेतील शेवटचा सामना ब्रिसबेनमध्ये पार पडला. तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे भारतीय खेळाडू लगेचच कोलकाताला जाण्यासाठी रवाना होणार आहेत.

स्थानिक टीम मॅनेजरने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल हे खेळाडू ब्रिसबेनहून थेट कोलकात्याला रवाना होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ रविवारी चेक -इन करू शकतो. तर भारतीय संघातील खेळाडू सोमवारी हजेरी पोहोचू शकतात.”

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटीत खेळवला जाईल. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३० नोव्हेंबरला रांचीत रंगणार आहे. तर दुसरा सामना ३ डिसेंबरला रायपूरमध्ये खेळवला जाईल. तर तिसरा सामना ६ डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये खेळवला जाईल.

तर टी -२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबरला कटकमध्ये, दुसरा सामना ११ डिसेंबरला चंदिगडमध्ये, तिसरा सामना १४ डिसेंबरला धर्मशाळा, चौथा सामना १७ डिसेंबरला लखनऊमध्ये आणि मालिकेतील शेवटचा सामना १९ डिसेंबरला अहमदाबामध्ये खेळवला जाईल.