आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये टीम इंडियाच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये केएल राहुलची बॅट शांत होती. बांगलादेशविरुद्ध फॉर्ममध्ये परतत केएल राहुलने अर्धशतक ठोकून टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. कर्णधार रोहित शर्मा लवकर बाद झाला, पण केएल राहुलने विराट कोहलीच्या साथीने मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. सामना संपल्यानंतर केएल राहुलने नेटमध्ये विराट कोहलीसोबत काय चर्चा केली ते सांगितले.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि केएल राहुलचा नेटमधील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये विराट त्याला ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी काही टिप्स देत असल्याचे दिसत होते.

बांगलादेशविरुद्धचा सामना पार पडल्यानंतर एक पत्रकार परिषद झाली. त्याच्यामध्ये केएल राहुलला विचारण्यात आले की, नेटमध्ये सराव करताना विराट कोहली सोबत काय बोलणे झाले होते. यावर बोलताना केएल राहुल म्हणाला, ”विराट मला आस्ट्रेलियातील बॅटींग कंडिशनबद्धल सांगत होता. तो मला सांगत होता की, यापूर्वी ऑस्ट्रेलियात टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, परंतु यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. या वेळी येथे खेळणे पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक आहे.”

हेही वाचा – “मी जे काही आहे त्याच्यामुळेच आहे”, टीम इंडियात संधी मिळाल्यावर कुलदीप सेन झाला भावूक, ‘या’ खेळाडूला दिले श्रेय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केएल राहुल पुढे म्हणाला, ”टीम इंडियातील आम्ही खेळाडू असेच बोलत राहतो.” विराट कोहली या टी-२० विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असून त्याने चार डावात तीन अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहलीने या टी-२० विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत, एवढेच नाही तर टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याने केला आहे.