Asia Cup 2023: के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर फिट आहेत का? आणि तसे असल्यास, त्यांना कोणतेही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सामने न खेळता भारताच्या आशिया कप संघात थेट प्रवेश मिळावा का? हे दोन सर्वात मोठे प्रश्न आहेत जे सध्या प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात आहेत. रविवारी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ पुरुष निवड समिती ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२३ साठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करेल तेव्हा याचे उत्तर येण्याची शक्यता आहे. मात्र, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि दोन माजी निवडकर्ते एम.एस.के प्रसाद आणि संदीप पाटील यांच्यात त्याच्या फिटनेस आणि आहाराबाबत एका वाहिनीवरील संभाषणात जोरदार वाद झाला.

स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमादरम्यान रवी शास्त्री, एम.एस.के प्रसाद आणि संदीप पाटील तज्ञ म्हणून सामील झाले. ज्यामध्ये तिघांनीही आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी संघ निवडीबाबत आपापली मते मांडली. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, फलंदाज श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल दुखापतीमुळे रिहॅबिलिटेशनमध्ये होते. जसप्रीत बुमराह तंदुरुस्त झाल्यानंतर विश्वचषक आणि आशिया चषक पाहता त्याला आयर्लंड मालिकेसाठी पाठवण्यात आले आहे. पण के.एल. राहुल आणि श्रेयस अजूनही एनसीएमध्ये सराव करत आहेत आणि दोन्ही खेळाडूंना कोणतेही स्पर्धात्मक सामने मिळालेले नाहीत.

Krishna Janmabhoomi case mathura
‘श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह वाद’ भाजपासाठी फायद्याचा ठरणार? मथुरावासीयांच्या काय आहेत भावना?
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

वास्तविक, भारतीय संघाला केवळ अय्यर आणि राहुल या दोघांना संघात ठेवायचे नाही, तर त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळायला द्यायचे आहे, यात शंका नाही. याची अनेक कारणे आहेत. दोन शतके आणि ४७च्या सरासरीसह, अय्यर गेल्या काही वर्षांमध्ये भारतासाठी क्रमांक ४ वर सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. हा फलंदाज फिरकीविरुद्ध खूप चांगली खेळी खेळतो. अय्यर एकदिवसीय विश्वचषक आणि आशिया कपमध्ये टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. जर के.एल. राहुल संघात असेल तर विकेटकीपिंगसह पाचव्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज आहे, जो संघाच्या फलंदाजीला डेप्थ देतो.

प्रश्न असा आहे की, आशिया चषकासारख्या स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंचा थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणे धोक्याचे ठरणार नाही का? राहुल आणि अय्यर या दोघांनीही त्यांचा फिटनेस सिद्ध करण्यासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये किमान दोन सामने खेळले आहेत. ताज्या वृत्तांनुसार, दोघांमध्ये राहुलची स्थिती खूपच चांगली असल्याचे दिसते. मात्र, निवड समिती, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना काय वाटते यावर सर्व अवलंबून असेल. भारताकडे सूर्यकुमार यादव आणि इशान किशनसारखे खेळाडू आहेत, जे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत.

हेही वाचा: Kapil Dev: “रोहित शर्मा-विराट कोहलीने किती डोमेस्टिक सामने खेळले?” आशिया कपआधी कपिल देव यांनी साधला निशाना

दुसरीकडे, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, भारताच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील आणि एम.एस.के प्रसाद यांच्यात आशिया चषक निवडीवरील स्टार स्पोर्ट्सच्या विशेष कार्यक्रमादरम्यान ऑन-एअर जोरदार वादविवाद झाला. बघूया कोण काय म्हणाले…

सौजन्य- हॉटस्टार (ट्वीटर)

एम.एस.के प्रसाद: के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर फिट असतील तर?

रवी शास्त्री: त्यांना काही सामने खेळायला सांगा. आशिया चषकापूर्वी त्यांना काही सामने द्या.

एम.एस.के प्रसाद: बरं, सामना खेळल्यानंतर तो तंदुरुस्त असल्याचे समजू.

रवी शास्त्री: तो कुठे आणि कधी खेळणार? आशिया चषक काही आठवड्यांत सुरू होणार आहे.

एम.एस.के प्रसाद: मी के.एल. राहुलला एनसीएमध्ये खेळताना पाहिले आहे. तो तंदुरुस्त दिसत आहे. तो संघात सामील होऊ शकतो.

संदीप पाटील: नेटमध्ये खेळणे आणि मॅचमध्ये खेळणे हे पूर्णपणे वेगळे आहे.

एम.एस.के प्रसाद: सँडी भाई, त्यांनी त्याच्यासाठी आधीच दोन सामने आयोजित केले आहेत.

संदीप पाटील: पण हे स्पर्धात्मक सामने होते का? मैत्रीपूर्ण किंवा सराव सामना खेळून धावा करणे सोपे आहे.

रवी शास्त्री: दुखापती होतच असतात आणि तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. बुमराहसारखी घाई करण्याचा प्रयत्न करू नका. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा, म्हणजे आणि तो आता १४ महिन्यांपासून बाहेर बसला आहे. विशेष म्हणजे या तिघांनी मिळून ज्या संघाची निवड केली त्यात अय्यर किंवा राहुल नव्हते. त्यांनी सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि युवा खेळाडू तिलक वर्मा यांचा भारताच्या १५ सदस्यीय संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला, ज्यांनी वेस्ट इंडिजमधील पदार्पणाच्या मालिकेत चांगली छाप पाडली.

हेही वाचा: Vinesh Phogat: विनेश फोगाटवर यशस्वी मुंबईत शस्त्रक्रिया; पुनरागमनाबाबत केले मोठे विधान, म्हणाली, “मी पूर्णपणे…”

संघात कोणीही स्थान विकत घेतलेले नाही

माजी खेळाडू संदीप पाटील म्हणाले, “डावखुरा सलामीवीर जोडीदारासह रोहित शर्मा अधिक सोयीस्कर असेल हे मला मान्य नाही. गिलने त्याच्यासोबत डावाची सुरुवात केली पाहिजे.” ज्यावर रवी शास्त्री म्हणाले, “सँडीचा एक मुद्दा बरोबर आहे, परंतु आम्ही किशनच्या चांगल्या कामगिरीबद्दलही बोललो. गिलचे २०२३ हे वर्ष छान गेले. तिथेच तुम्हाला खेळाडूची मानसिकता पाहावी लागेल.”

“शुबमन गिलला सलामीला फलंदाजी करण्याऐवजी तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितले तर त्याला कसे वाटेल? संघात कोणाचेही जागा जाणार नाही. जर विराटला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायची असेल तर तो संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. संघात कोणीही स्थान विकत घेतलेले नाही,” असेही ते पुढे म्हणाले.