Akash Chopra predicts about third ODI match: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मेन इन ब्लूने २००६ पासून विंडीजविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही. मंगळवारचा सामना जिंकून हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शेवटच्या वनडेत संधी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याआधी भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने शेवटच्या सामन्याबाबत काही अंदाज वर्तवले आहेत.

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर भारत-वेस्ट इंडिजच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्याबद्दल सांगितले की, दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ सामना जिंकेल. तो म्हणाला, “जो संघ धावांचा पाठलाग करेल तो जिंकेल. प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकेल, असे मला वाटत नाही. तथापि, जर भारताने नाणेफेक जिंकली तर त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आम्ही प्रयोग करत आहोत.”

हेही वाचा – जसप्रीत बुमराहचं जोरदार पुनरागमन, ‘या’ मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार, मराठमोळ्या खेळाडूकडे मोठी जबाबदारी

तिसरा सामना होणार नाही उच्च स्कोअरिंग –

आकाश चोप्राला मालिकेतील शेवटचा सामना जास्त धावसंख्येचा असेल अशी अपेक्षा नाही. तो म्हणाला, “प्रथम फलंदाजी करणारा संघ २७५ पेक्षा कमी धावा करेल. यात नवीन काय आहे ते तुम्ही म्हणाल. हा सामना बार्बाडोसमधील नाही, जिथे धावा होत नाहीत. हा सामना तारुबामध्ये आहे, पण सत्य हे आहे की इथेही धावा होत नाहीत.” आकाश चोप्रा यांनी सांगितले की, तारौबा येथे गेल्या २३ एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ पाच किंवा सहा वेळा २५० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तो पुढे म्हणाला की, सकाळी ९:३० ची सुरुवात, जी भारतीय प्रेक्षकांना अनुकूल आहे, ती देखील फलंदाजांना मदत करणार नाही.

हेही वाचा – ऑस्ट्रेलियाला पाचव्या कसोटीत नमवत इंग्लंडची मालिकेत २ – २ बरोबरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिरकीपटू घेतील सर्वाधिक विकेट्स –

मालिकेतील शेवटच्या सामन्यात फिरकीपटू जास्त विकेट घेतील, असे आकाश चोप्राने भाकीत केले . तो म्हणाला, “या खेळपट्टीवर बार्बाडोसच्या खेळपट्टीप्रमाणे नवीन चेंडूसाठी तितकी मदत होणार नाही, परंतु तरीही मला वाटते की काही प्रमाणात मदत होईल. यानंतर येथेही फिरकीपटूंचे वर्चस्व राहील. मला वाटते की फिरकीपटू आठ किंवा त्याहून अधिक विकेट घेतील. तुम्हाला विरोधी संघात गुडाकेश मोती आणि यानिक कारिया दिसतील आणि अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव भारताकडून खेळताना तुम्ही पाहू शकता.”