Akashdeep made a revelation about Virat Kohli’s bat : भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने विराट कोहलीची खास बॅट कशी मिळवली याचा खुलासा केला आहे, ज्यामुळे त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान गाबा कसोटी वाचवण्यात मदत झाली. आकाश दीपने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा कसोटीत ३१ धावांची शानदार खेळी खेळली, जी भारतासाठी फॉलोऑन टाळण्यात महत्त्वाची ठरली. फॉलोऑन वाचवल्यानंतर उर्वरित खेळ पावसामुळे वाया आणि सामना अनिर्णित राहिला.

आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल खुलासा –

बांगलादेश मालिकेदरम्यान आकाश दीपला विराट कोहलीची बॅट मिळाली होती. या बॅटने त्याने कानपूरमध्ये तुफानी फलंदाजी केली होती. त्याने नुकतेच सांगितले की, विराट कोहलीने त्याला बॅट हवी आहे का, असे विचारले होते. वेगवान गोलंदाजाने पीटीआयला सांगितले की, कोहलीच त्याच्याकडे आला होता आणि त्याला बॅट हवी आहे का असे विचारले. आकाश दीप पुढे म्हणाला की, त्याने लगेच प्रतिक्रिया दिली आणि स्टार फलंदाजाला सांगितले की जगातील कोणालाही त्याची बॅट घ्यायला आवडेल.

‘होय, ती विराट भैय्याचीच बॅट होती’ –

भारताचा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीप म्हणाला, “होय, ती एमआरएफचा लोगो असलेली बॅट विराट भैय्याची होती. याबाबत सर्वांनाच माहिती आहे. विराट भैय्याने स्वतः मला विचारले होते की, ‘तुला बॅट हवी आहे का?’ मी म्हणालो, ‘हो भैय्या, जगात कोणाला तुमची बॅट नको असेल? मग त्यांनी ती मला गिफ्ट केली.” आकाश दीप म्हणाला की आरसीबीमध्ये त्याचा सहकारी असूनही त्याला कोहलीला बॅट मागताना थोडा संकोच वाटत होता. विशेषत: सामन्यादरम्यान कोहलीला त्रास द्यायचा नव्हता, असे या वेगवान गोलंदाजाने सांगितले.

‘भैय्याने स्वतः मला बॅट दिली’ –

हेही वाचा – Wankhede Stadium : १९७४ च्या मुंबई संघातील ८ सदस्यांचा एमसीएकडून प्रत्येकी १० लाख रुपये देऊन गौरव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाश दीप पुढे म्हणाला, “मी गेल्या काही काळापासून भैय्या सोबत आहे. पण तुमच्या मनात नेहमी एक विचार असतो की विराट भैय्यासारख्या महान व्यक्तीकडून बॅट मागणे योग्य आहे की नाही. विशेषतः सामन्याच्या वेळी, जेव्हा ते लक्ष केंद्रीत करत असतात आणि त्यांच्या झोनमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही त्यांना त्रास देऊ इच्छित नसता, पण भैय्याने स्वतः मला बॅट दिली.