Ambati Rayudu’s reaction on Rohit Sharma : इंडियन प्रीमियर लीग २०२४ (आयपीएल २०२४ ) २२ मार्चपासून सुरू होणार आहे. याआधी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या आयपीएल हंगामात रोहितच्या जागी पंड्या मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गुजरात टायटन्सकडून ट्रेड केल्यानंतर तो मुंबई संघात आला आहे. त्याला कर्णधारही करण्यात आले आहे.

मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाबाबत, न्यूज 24 स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत अंबाती रायgडूने सांगितले की, त्याला भविष्यात रोहित शर्माला चेन्नई सुपर किंग्जमध्ये बघायचे आहे. तो म्हणाला की मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणे हार्दिक पंड्यासाठी सोपे नसेल. आयपीएल २०२२ पूर्वी पंड्याला मुंबई इंडियन्सने सोडले होते. त्यानंतर गुजरात टायटन्स या नवीन फ्रेंचायझीने त्याला आपला कर्णधार नियुक्त केले. गुजरातने पहिल्या सत्रात जेतेपद पटकावले. त्यानंतर दुसऱ्या हंगाामा उपविजेता ठरला.

रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्याबाबत अंबाती रायुडू म्हणाला, “मला वाटते की मुंबईने या वर्षी थोडी घाई केली आहे. यावर्षी कर्णधारपद रोहितकडेच ठेवायला हवे होते. तसेच हार्दिकने या वर्षी खेळून पुढच्या वर्षी कर्णधारपद स्वीकारले असते तर बरे झाले असते. कारण रोहित अजूनही टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. मला वाटते की त्यांनी थोडी घाई केली आहे, परंतु त्यांना आणि त्यांच्या व्यवस्थापनाला माहित आहे की काय करायचे आहे.”

हेही वाचा – WPL 2024 : हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावल्याने रिचा घोषला अश्रू अनावर, VIDEO होतोय व्हायरल

पंड्याबद्दल रायडू काय म्हणाला?

हार्दिक पंड्याबद्दल रायुडू म्हणाला, “ हार्दिक गुजरात टायटन्सच्या सेटअपमधून मुंबईत आला आहे. त्यामुळे निश्चितपणे हे थोडे कठीण जाईल.” कारण गुजरात टायटन्सचा सेटअप थोडा वेगळा आहे. मुंबई इंडियन्सचा सेटअप वेगळा आहे. यापूर्वी तो मुंबईकडून खेळला आहे, पण कर्णधारपद भूषवलेले नाही. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणे सोपे नाही. संघात स्टार खेळाडूंचा भरणा आहे आणि त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत, त्यामुळे दडपण थोडे जास्त असेल. सगळ्यांना हाताळणं इतकं सोपं नसतं. हार्दिकसाठी ही एक चांगली संधी आहे.”

हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गारद; मुंबई रणजी विजयाच्या जवळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंबाती रायुडूला रोहितला चेन्नईत बघायचेय –

रोहितबाबत रायुडू म्हणाला की, मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय चर्चा करुनच घेतला असावा, असे त्याला वाटते. रोहित अजून ५ ते ६ वर्षे आरामात आयपीएल खेळेल असे त्याने सांगितले. त्याचबरोबर त्याला रोहित हा चेन्नईसाठी खेळताना पाहायचे आहे. तसेच हे रोहित शर्मावर अवलंबून आहे की त्याला नेतृत्व करायचे आहे की नाही. जर रोहित शर्माला कर्णधार व्हायचे असेल, तर संपूर्ण जग त्याच्यासाठी खुले आहे. तो कुठेही जाऊन नेतृत्व करू शकतो. काय करायचं हे त्यांच्यावर अवलंबून आहे.