आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या ट्वेन्टी -२० सामन्यात भारताने बांगलादेशला ४५ धावांनी हरवून विजयी सलामी दिली आहे. या सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकांत सात बाद १२१ धावाच करता आल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या ८३ धावांच्या दणदणीत खेळीमुळे भारताने वीस षटकांत सहा बाद १६६ धावांची मजल मारली होती. दरम्यान, भारतीय गोलंदाजांनीही आज टिच्चून गोलंदाजी करीत बांगलादेशच्या फलंदाजांना वेसण घातली. भारताकडून आशिष नेहराने सर्वाधिक 3 तर बुमरा, पंड्या आणि अश्विनने प्रत्येकी एक-एक गडी टिपला.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2016 रोजी प्रकाशित
भारताचा बांगलादेशवर ४५ धावांनी विजय
भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 24-02-2016 at 22:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup 2016 india beat bangladesh by 45 runs in mirpur