Indian players Fitness Test: आशिया कप २०२३साठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह इतर अव्वल खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात येणार आहे. ज्यामध्ये रक्त तपासणीसह संपूर्ण शरीराचे चेकअप केली जाईल. कारण, आगामी विश्वचषक २०२३च्या दृष्टीकोनातून बीसीसीआयला खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणताही धोका पत्करायचा नाहीये. आशिया चषकाला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतलेल्या आणि आयर्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळत नसलेल्या खेळाडूंना १३ दिवसांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अष्टपैलू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यांच्या सराव शिबीराला सुरुवात होणार असून त्यात फिटनेस टेस्ट केली जाणार आहे. लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखर (उपवास आणि पीपी), यूरिक ऍसिड, कॅल्शियम, जीवनसत्त्वे बी १२ आणि डी, क्रिएटिनिन, टेस्टोस्टेरॉन या घटकांची तपासणी केली जाईल. त्याचबरोबर डेक्सा चाचण्या देखील घेतल्या जातील, हाडांची घनता तपासण्यासाठी हा एक प्रकारचा स्कॅन आहे. दरम्यान व्हीव्हीएस लक्ष्मण, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघाचे फिजिओ हे देखील उपस्थित राहणार आहेत.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला खेळाडूंच्या फिटनेस कार्यक्रमाविषयी सांगितले की, “खेळाडूंसाठी हा एक खास कार्यक्रम आहे कारण, पुढील दोन महिने त्यांनी तंदुरुस्त राहावे अशी आमची इच्छा आहे. कोणी प्रोग्राम फॉलो केला आणि कोणी केला नाही हे ट्रेनरला समजेल. यानंतर, ज्या खेळाडूने याचे काटेकोरपणे पालन केले नाही त्याचे काय करायचे हे संघ व्यवस्थापन ठरवेल.”

हेही वाचा: IND vs IRE 3rd T20: भारत-आयर्लंडच्या मालिकेत हे पहिल्यांदाच घडलं; अखेर साडेतीन तासानंतर झाला फैसला, जाणून घ्या

आशिया कपसाठी ‘एनसीए’चा फिटनेस कार्यक्रम

फिटनेस रूटीन हे शरीराची सर्व हालचाल, खांद्याची काळजी आणि ग्लूट स्नायूंबद्दल आहे.

याशिवाय खेळाडू ताकदीवरही लक्ष देतील.

एनसीएने प्रत्येक खेळाडूसाठी खास दिनचर्या तयार केली होती.

प्रत्येक खेळाडूला विशिष्ट प्रमाणात प्रथिने घेणे, पूर्ण जिम सेशन घेणे, चालणे, धावणे, नंतर पोहण्याचे सत्र घेणे आवश्यक होते.

विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंना योगासनांसह ९ तासांची झोप घ्यावी लागली.

याशिवाय एनसीएने प्रत्येक खेळाडूसाठी विशेष कवायती तयार केल्या.

अलीकडेच वेस्ट इंडिज आणि आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत भारतीय संघातील अव्वल खेळाडू खेळले नाहीत. या टी२० मालिकेसाठी त्यांना विश्रांती देण्यात आली होती. आता विराट कोहलीसह रोहित शर्मासारखे खेळाडू थेट आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. लवकरच भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना होणार आहे.

हेही वाचा: Asia cup 2023:  आशिया चषकात युजवेंद्र चहलला वगळल्याने हरभजन सिंग संतापला; म्हणाला, “त्याच्यापेक्षा चांगला गोलंदाज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिया कप २०२३ साठी भारतीय संघ

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा