IND vs PAK Pitch Report: दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत- पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. तर ७:३० वाजता नाणेफेक होईल. या स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्यांदा साखळी फेरीत जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आता सुपर ४ फेरीतील सामना रंगणार आहे. सर्व संघांसाठी प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यात खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या भारत -पाकिस्तान सामन्याचा पिच रिपोर्ट.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारत- पाकिस्तान सामना त्याच खेळपट्टीवर होणार आहे ज्या खेळपट्टीवर साखळी फेरीतील सामना खेळवला गेला होता. गेल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना मदत मिळाली होती. यावेळीही फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. गेल्या सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाज पाकिस्तानवर भारी पडले होते. यावेळीही असेच काहीसं चित्र पाहायला मिळू शकतं. सामन्यावेळी तापमान ३५ डिग्री अंश सेल्सिअस इतकं असेल असा अंदाव वर्तवला जात आहे.
भारत- पाकिस्तान संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?
भारत- पाकिस्तान हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. पण याआधी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला. फलंदाज धावा करू शकले नाहीत आणि गोलंदाजांना विकेट्स काढून देता आल्या नाहीत. त्यामुळे भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ १४ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ११ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर पाकिस्तानला केवळ ३ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळे पाकिस्तानविरूद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड नेहमीच दमदार राहिला आहे.
या स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ:
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा,संजू सॅमसन,हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा,वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
aसलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, हुसेन तलत, खुशदिल शाह,साहिबजादा फरहान, सईम अयूब, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, मोहम्मद वसीम जूनिअर,मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, हसन नवाज, सलमान मिर्झा.