वृत्तसंस्था, दोहा

Qatar vs Lebanon football match updates गतवर्षी तीन स्पर्धाचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने आज, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवून बाद फेरी गाठण्याचे ध्येय बाळगले आहे.

Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 : आज आरसीबीसमोर राजस्थानच्या विजय रथाला रोखण्याचे आव्हान, आतापर्यंत कोणाचे राहिले वर्चस्व? जाणून घ्या

आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या १८व्या पर्वाला यजमान कतार आणि लेबनन यांच्यातील सामन्याने शुक्रवारी सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे. भारतीय संघाला (१०२व्या स्थानी) जागतिक क्रमवारीत आपल्यापेक्षा वरच्या स्थानांवर असलेल्या ऑस्ट्रेलिया (२५व्या स्थानी), उझबेकिस्तान (६८व्या स्थानी) आणि सीरिया (९१व्या स्थानी) या संघांविरुद्ध साखळी फेरीत खेळावे लागणार आहे. त्यामुळे भारताला स्पर्धेत आगेकूच करणे आव्हानात्मक ठरणार आहे.

हेही वाचा >>>SL vs ZIM 3rd ODI : वानिंदू हसरंगाचा मोठा पराक्रम! झिम्बाब्वेविरुद्ध सात विकेट्स घेत लावली विक्रमांची रांग

भारतीय संघ पाचव्यांदा आशिया चषक फुटबॉलमध्ये खेळणार आहे. भारताने १९६४ साली या स्पर्धेत पदार्पण केले होते आणि चार संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. भारताची ही या स्पर्धेतील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानंतर भारताला एकदाही बाद फेरी गाठता आलेली नाही. यंदाही भारताकडून फारशा अपेक्षा बाळगल्या जात नसल्या तरी गटात तिसरे स्थान मिळवून बाद फेरी गाठण्याची त्यांच्याकडे संधी आहे. मात्र, त्यासाठी त्यांना किमान एक सामना जिंकावा लागेल.

यंदाच्या स्पर्धेत जपान, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया या संघांना जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहे. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इराण हे संघही दर्जेदार कामगिरीची क्षमता राखून आहेत.

हेही वाचा >>>IND vs AFG 1st T20 : रोहित शर्मा शून्यावर धावबाद झाल्यानंतर गिलवर संतापला, शुबमनवर ओरडतानाचा VIDEO व्हायरल

कतारने २०२२च्या अखेरीस ‘फिफा’ विश्वचषकाचे यशस्वी आयोजन केले होते. आता फुटबॉलविश्वातील आपली वाढती ताकद पुन्हा दाखवण्याची कतारला संधी मिळणार आहे. आशिया चषक फुटबॉल स्पर्धा २०२३मध्ये चीन येथे आयोजित केली जाणार होती. मात्र, करोनामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर कतारमध्ये भव्य स्टेडियम उभारण्यात आले होते. तसेच अन्य सुविधाही येथे असल्याने चीनऐवजी कतारला आशिया चषकाच्या यजमानपदाचा मान देण्यात आला. त्यामुळे विश्वचषकापाठोपाठ आता आशियातील सर्वात मोठय़ा फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनाची संधी कतारला मिळणार आहे. 

स्पर्धेचे स्वरूप कसे?

आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत एकूण २४ संघांचा समावेश असून त्यांना सहा गटांमध्ये विभागाण्यात आले आहे. प्रत्येक गटात चार संघांचा समावेश असून ते एकमेकांविरुद्ध साखळी सामने खेळतील. साखळी फेरीअंती प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ, तसेच तिसऱ्या क्रमांकावरील सर्वोत्तम चार संघ उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील.

सलामीची लढत

कतार वि. लेबनन

वेळ : रात्री ९.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्पोर्टस १८-३, जिओ सिनेमा