scorecardresearch

Premium

Asia Cup 2023: चाहत्यांसाठी खूशखबर आशिया कपचे सर्व सामने तुम्ही पाहू शकता विनामूल्य; कधी, कुठे? जाणून घ्या

Asia Cup Live Streaming When, Where: आशिया चषकाचे काही सामने हे पाकिस्तानात आणि उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जातील. ३० ऑगस्टपासून याला सुरुवात होणार आहे.

Asia Cup 2023: Good news for fans you can watch Asia Cup online for free when, where to watch get to know
आशिया चषकाचे काही सामने हे पाकिस्तानात आणि उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जातील. सौजन्य- (ट्वीटर)

Asia Cup Live Streaming when, where to watch: बुधवारी (३० ऑगस्ट) पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभही आयोजित केला जाणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेतील १३ पैकी चार सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीने श्रीलंकेसोबत सह-यजमानपदाचा निर्णय घेतला. स्पर्धेचा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे खेळवला जाईल.

भारतीय संघ २ सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याच मैदानावर त्याचा दुसरा सामना ४ सप्टेंबरला नेपाळशी होणार आहे. आशिया चषकाचे सामने पाकिस्तानातील मुलतान येथील मुल्तान क्रिकेट स्टेडियम आणि लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवले जातील. याशिवाय, कॅंडी, श्रीलंकेतील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवरही सामने होणार आहेत.

loksatta analysis why india lost world cup final against australia
ऑस्ट्रेलिया ३ – भारत ०… विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये भारत ऑस्ट्रेलियासमोर का ढेपाळतो?
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी
U19 World Cup Semi Final 2024 IND vs SA Match Updates in marathi
U19 World Cup 2024 : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
U19 World Cup 2024 Super Six Stage Schedule Announced
U19 WC: अंडर १९ विश्वचषकातील ‘सुपर सिक्स’चे वेळापत्रक जाहीर, भारताचा सामना कोणकोणत्या संघाविरुद्ध होणार?

या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत

यावेळी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ खेळणार आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर-४ मध्ये जातील. तेथून दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

हेही वाचा: Asia Cup 2023: श्रीलंकेने आशिया कप २०२३साठी सदस्यीय संघ केला जाहीर, कोणाची हाती आहे टीमची कमान? जाणून घ्या

आशिया कपच्या थेट प्रक्षेपणाशी संबंधित सर्व माहिती आम्ही तुम्हाला येथे देत आहोत:

आशिया कपचा उद्घाटन सोहळा कधी होणार?

आशिया चषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी (३० ऑगस्ट) होणार आहे. पाकिस्तान-नेपाळ यांच्यातील सलामीच्या सामन्यापूर्वी हे होईल.

कुठे होणार आशिया कपचा उद्घाटन सोहळा?

आशिया कपचा उद्घाटन सोहळा पाकिस्तानातील मुलतान येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

आशिया कपचा उद्घाटन सोहळा किती वाजता सुरू होईल?

पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल. त्याआधी उद्घाटन सोहळा होणार आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: “कोहलीविरुद्ध स्लेजिंग करू नका, तो कंटाळा…”, ‘या’ दक्षिण आफ्रिकी खेळाडूचा गोलंदाजांना सल्ला

आशिया चषक उद्घाटन समारंभ आणि सामने यांचे थेट प्रक्षेपण भारतात कोठे असेल?

आशिया चषक उद्घाटन सोहळा स्टार स्पोर्ट्सद्वारे भारतात थेट प्रक्षेपित केला जाईल. भारतातील आशिया कप सामन्यांचे थेट प्रक्षेपण देखील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. प्रेक्षकांना हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर टीव्हीवर पाहता येणार आहे. त्याच वेळी, विनामूल्य डीटीएच वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर भारताचे सामने पाहू शकतील. या वाहिनीवर अंतिम सामनाही प्रसारित केला जाणार आहे.

आशिया चषक उद्घाटन समारंभ आणि सामन्यांचे थेट प्रवाह भारतात कुठे उपलब्ध असेल?

आशिया चषक उद्घाटन समारंभ हॉटस्टारवर भारतात लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. चाहते त्याचा विनामूल्य आनंद घेऊ शकतात. हॉटस्टारवर तुम्ही आशिया कपचे सर्व सामने विनामूल्य पाहू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asia cup which channel will broadcast the asia cup matches this is how you can watch all the matches for free avw

First published on: 29-08-2023 at 19:49 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×