फुटबॉल क्षेत्रातील दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे दुबईत चोरी झालेले घड्याळ भारतीय पोलिसांनी शोधून काढले आहे. हे घड्याळ शनिवारी सकाळी आसामच्या शिवसागर जिल्ह्यातून जप्त करण्यात आले, त्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. मॅराडोना यांचे हुब्लोट (Hublot watch) हे मौल्यवान घड्याळ चोरीला गेले होते.

आरोपी व्यक्ती दुबई येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती, जी मॅराडोना यांच्या वस्तूंची देखरेख करत होती. पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांनी सांगितले, ”एका तिजोरीच्या चोरीमध्ये आरोपीचा सहभाग असल्याचा संशय आहे, ज्यामध्ये मॅराडोना यांचे लिमिटेड एडिशन हुब्लोट घड्याळ ठेवण्यात आले होते. कंपनीत काही दिवस काम केल्यानंतर, आरोपी ऑगस्टमध्ये आसामला परतला. त्याने त्याच्या वडिलांची तब्येत खराब असल्याचे सांगून सुटी घेतली.”

दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आसाम पोलिसांनी रविवारी पहाटे ४ वाजता सिवसागर येथील राहत्या घरी जाऊन संबंधित आरोपीला अटक केले. आसाम पोलिस आणि दुबई पोलिस यांच्यातील समन्वयाने ही कारवाई शक्य झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – रोहितला नको होतं टी-२० संघाचं कर्णधारपद; निवड समितीकडं केलेली ‘मागणी’ ऐकाल तर विचारातच पडाल!

मॅराडोना यांनी वापरलेले हे घड्याळ वाझिद हुसेन नावाच्या वक्तीने चोरले होते. आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्व सर्मा यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. १९८६मध्ये अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. मागील वर्षी त्यांचे निधन झाले.