Kagiso Rabada Bowling, AUS vs SA: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील फायनलचा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला आहे.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने एकाच षटकात ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के दिले आहेत.

कागिसो रबाडाची कमाल गोलंदाजी, मार्करमचा भन्नाट झेल

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार कागिसो रबाडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गोलंदाजांना मिळणाऱ्या मदतीचा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबूशेन ही जोडी मैदानावर आली. सुरूवातीला दोन्ही फलंदाजांनी चेंडू सोडून दिले.मात्र, कागिसो रबाडाने फलंदाजांना चेंडू खेळण्यास भाग पाडलं.

पहिल्या डावातील ७ वे षटक दक्षिण आफ्रिकेसाठी टर्निंग पॉईंट ठरले. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर उस्मान ख्वाजा २० चेंडू खेळून शून्यावर माघारी परतला. रबाडाने आऊट साईड ऑफच्या दिशेने चेंडू टाकला. हा चेंडू टप्पा पडताच आत आला आणि बॅटची कडा घेऊन पहिल्या स्लिपमध्ये असलेल्या डेव्हिड बेडिंघमच्या हातात गेला. त्याने कुठलीही चूक न करता, भन्नाट झेल घेतला.

त्यानंतर या षटकातील शेवटच्या चेंडूवर कॅमरून ग्रीन देखील बाद होऊन माघारी परतला. ग्रीनने पहिल्याच चेंडूवर लेग साईडच्या दिशेने चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. रबाडाने टाकलेला चेंडू बॅटची कडा घेत दुसऱ्या स्लिपमध्ये गेला. दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या एडन मार्करमने कुठलीही चूक न करता डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

या सामन्यासाठी अशी आहे दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११:

एडन मार्करम, रायन रिकल्टन, वियान मल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंघम, काइल वेरेयने (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी

या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅ्व्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवूड