ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज अ‍ॅलन थॉमसन यांचे सोमवारी वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. थॉमसनने वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिली विकेट घेतली होती. रिपोर्ट्सनुसार, थॉमसन काही दिवसांपूर्वीच पडले होते, त्यानंतर त्याच्यावर हिप रिप्लेसमेंटची शस्त्रक्रियाही झाली होती.

अ‍ॅलन त्याच्या विचित्र अ‍ॅक्शनसाठी प्रसिद्ध होते. १९७०-७१ मध्ये खेळल्या गेलेल्या सात कसोटींच्या ऍशेस मालिकेत त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले होते. ते ब्रिस्बेन आणि पर्थ येथे पहिल्या दोन कसोटीत खेळले, पण मेलबर्नमधील नवीन वर्षाच्या कसोटीसाठी त्याची निवड झाली नाही. मात्र एकही चेंडू न टाकता पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. मालिकेतील पाचवा आणि सहावा कसोटी सामना खेळला पण त्याआधी त्यांनी इतिहास रचला.

मेलबर्न कसोटी सामन्याचे पहिले तीन दिवस पावसामुळे वाहून गेले. अधिकार्‍यांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला, परंतु दोन्ही संघांनी वनडे खेळण्याचा निर्णय घेतला आणि ४० षटकांचा सामना खेळवण्यात आला. अशाप्रकारे, ५ जानेवारी १९७१ रोजी मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात वनडे क्रिकेट इतिहासातील पहिला सामना खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू उपलब्ध असणार नाही

थॉमसन यांनी या सामन्यात पहिली विकेट घेतली, त्यांनी स्क्वेअर लेगवर बिल लॉरीकरवी ज्योफ बॉयकॉटला झेलबाद केले. या सामन्यात अ‍ॅलननी आठ षटकांत २२ धावा देत एक बळी घेतला. मात्र, त्यानंतर ते ऑस्ट्रेलियाकडून वनडे सामने खेळले नाहीत. थॉमसनने ऑस्ट्रेलियासाठी एकूण ४ कसोटी सामने खेळले आणि १२ विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणीमध्ये त्यांनी ४४ सामने खेळले आणि त्यामध्ये 184 विकेट्स घेतल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.