हांगझो : पूर्वपुण्याईवर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सरावाशिवाय थेट प्रवेश मिळवणाऱ्या कुस्तीगीर बजरंग पुनियाला पदकाशिवाय माघारी परतावे लागले आहे. दुसरीकडे तीन उदयोन्मुख मल्लांनी कांस्यपदकाची कमाई करून भारताच्या पदकांत भर घातली. कुस्ती प्रकारात भारताने आतापर्यंत पाच कांस्यपदके मिळवली आहेत.

जानेवारी महिन्यापासून ब्रिजभूषणशरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करताना सरावाकडे दुर्लक्ष झालेल्या बजरंगला अखेर आशियाई स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. निवड चाचणीत सहभागी न होऊनही बजरंगला आशियाई स्पर्धेसाठी संघात थेट प्रवेश मिळाला होता.

candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता

दुबळय़ा रोनिल टुबॉग आणि अलिबेग अलिबेगोव यांच्यावर सहज विजय मिळवून बजरंगने उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत इराणच्या ताकदवान अमौझादखलीलीने बजरंगला पूर्णपणे निष्प्रभ केले. बजरंग ही लढत १-८ अशा मोठय़ा फरकाने गमावली. त्यामुळे बजरंगला कांस्यपदकाची लढत खेळावी लागली. मात्र, या लढतीत जपानच्या कायाकी यामागुचीने बजरंगला पराभूत केले. बजरंगला या लढतीत एकही गुण कमावता आला नाही. तांत्रिक आघाडीवर यामागुचीने १०-० असा विजय मिळवला.

हेही वाचा >>>World Cup 2023, PAK vs NED: विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांची दमछाक, नेदरलँडसमोर ठेवले २८७ धावांचे लक्ष्य

दरम्यान, पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात अमनने चीनच्या मिंघू लियू याला एकाही गुणाची संधी न देता १०-० असा विजय मिळवून कांस्यपदक पटकावले. तसेच सोनम मलिकने ६२ किलो वजनी गटात चीनच्या जिया लाँगचा ७-५ असा, तर ७६ किलो वजनी गटात किरणने मंगोलियाच्या अरिउंजार्गल गनबतचा ६-३ असा पराभव करुन कांस्यपदक मिळवले.

सेपकटरॉमध्ये अनपेक्षित कांस्य

भारताच्या महिला संघाने सेपकटकरॉच्या रेगू या सांघिक प्रकारात अनपेक्षित कांस्यपदकाची कमाई केली. भारतीय महिला संघाने या क्रीडा प्रकारात उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीच्या लढतीत शुक्रवारी भारताला बलाढय़ थायलंडकडून १०-२१, १३-२१ असा पराभव पत्करावा लागला. भारतीय संघात आयेकपाम मैपाक देवी, ओईनाम चाओबा देवी, खुशबू एलंगबाम प्रिया देवी आणि एलंगबाम लिएरेन्तोम्बी देवी या खेळाडूंचा समावेश होता.

हेही वाचा >>>Asian Games: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, ९ वर्षांनी सुवर्णपदकावर कोरले नाव

सात्त्विक-चिराग अंतिम फेरीत

बॅडिमटन प्रकारात एकेरीत सुवर्णपदक हुकले असले, तरी स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवण्याची आशा पुरुष दुहेरी जोडीने अंतिम फेरी गाठल्याने कायम राहिली. सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या आघाडीच्या जोडीने ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मलेशियाच्या आरोन शिया-सोह वुई यिक जोडीचा २१-१७, २१-१२ असा पराभव केला. दरम्यान एकेरीत एच. एस. प्रणॉयला उपांत्य फेरीत चीनच्या ली शिफेंगविरुद्ध २१-१६, २१-९ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे प्रणॉयला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

कबड्डीत पुरुष, महिला संघ अंतिम फेरीत कबड्डीत भारतीय महिला संघाने नेपाळचा ६१-१७ असा धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाच्या विजयात पुष्पा राणा, पूजा, निधी शर्मा, साक्षी कुमारी यांचा प्रमुख वाटा राहिला. पुरुष संघानेही पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ६१-१७ असा फडशा पाडला. पवन कुमार, अर्जुन देशवाल आणि सुरजित कुमार यांचा खेळ उल्लेखनीय ठरला. दोन्ही संघ अंतिम फेरीत इराणविरुद्ध खेळतील.